भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी मागील १० महिन्यांपासून क्रिकेटपासून दूर आहे. या दरम्यान धोनीच्या निवृत्तीच्या चर्चांना उधान आले आहे. अशात बुधवारी (२७ मे) अचानक सोशल मीडियावर त्याच्या निवृत्तीच्या बातम्या ट्रेंड होऊ लागल्या.
यादरम्यान धोनीची पत्नी साक्षी धोनीने (Sakshi Dhoni) ट्वीट करत या सर्व अफवा असल्याचे सांगितले. तरी त्यानंतर साक्षीने आपले ट्वीट डिलीट केले होते.
Sakshi dhoni tweeted and then deleted pic.twitter.com/BFyvblCwLR
— 𝑼𝑻𝑲𝑨𝑹𝑺𝑯 ♠️ (@Utkarsh2609) May 28, 2020
यामध्ये धोनीच्या चाहत्यांनी #DhoniRetires या हॅशटॅगचा वापर करत त्याचे जुने फोटो आणि व्हिडिओदेखील शेअर केले.
Thanks for the memories 🥺#DhoniRetires pic.twitter.com/V10qOr0QFI
— . (@Cule_Adi) May 27, 2020
https://twitter.com/Kolly_fan/status/1265674441377198080
Those who are trending #DhoniRetires should get a life , they either ignore or are unaware about the impact he had on the Team.
Unmatched Captaincy , Wicket Keeping Skills and among the fewest to be the No.1 batsman in the world while batting in the middle 🔥 pic.twitter.com/rjWsP3OYEr— A N K I T (@Ankitaker2) May 27, 2020
In these tough times remember the patience this man had even in 46th over 🙏🏽🙏🏽🙏🏽 #DhoniRetires pic.twitter.com/vtayUxBg51
— Rahul (@Ittzz_Rahul) May 27, 2020
https://twitter.com/Lil_Boies2/status/1265660633468420097
धोनीने (MS Dhoni) आपला शेवटचा सामना जुलै २०१९मध्ये झालेल्या विश्वचषकातील उपांत्य सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध (New Zealand) खेळला होता. त्यानंतर तो भारतीय संघापासून दूर आहे. विश्वचषकात धोनीच्या धिम्या गतीच्या फलंदाजीवर मोठ्या प्रमाणात टीकादेखील करण्यात आली होती.
धोनी आयपीएलच्या १३ व्या मोसमातून क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार होता. परंतु कोरोना व्हायरसमुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित केले आहेत. त्यामुळे त्याच्या क्रिकेटच्या पुनरागमनावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.
धोनीने आतापर्यंत ९० कसोटी सामने, ३५० वनडे सामने आणि आंतरराष्ट्रीय टी२० सामने खेळले आहेत. त्यात त्याने कसोटीत ३८.०९ च्या सरासरीने ४,८७६ धावा केल्या आहेत. तर वनडेत त्याने ५०.५७ च्या सरासरीने १०७७३ धावा केल्या आहेत. तसेच टी२०त त्याने ३७.६० च्या सरासरीने १६१७ धावा केल्या आहेत.
ट्रेंडिंग घडामोडी-
-असा असेल भारताचा ऑस्ट्रेलिया दौरा, होणार ४ कसोटी सामने?
-आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज
-आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज