fbpx
Monday, January 25, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज

September 16, 2020
in IPL, क्रिकेट, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ IPL

Photo Courtesy: Twitter/ IPL


जगातील सर्व टी२० लीगमधील सुप्रसिद्ध लीग म्हणजे इंडियन प्रीमियर लीग. २० षटकांची ही क्रिकेट लीग हा क्रिकेटचा वेगवान प्रकार आहे. त्यामुळे फलंदाज सहसा दमदार फटकेबाजी करत वेगाने धावा घेण्याचा प्रयत्न करत असतात. त्यामुळे आयपीएलदरम्यान मैदानावर चौकार आणि षटकारांचा पाऊस पडताना आपल्याला पाहायला मिळतो.

ख्रिस गेल, रोहित शर्मा, एबी डिविलियर्स, आंद्रे रसल अशा खेळाडूंना आयपीएलमध्ये त्यांच्या षटकारांसाठी ओळखले जाते. केवळ फलंदाजच नव्हे तर, गोलंदाजही यामध्ये मागे पडत नाहीत. जेव्हा जेव्हा त्यांना संधी मिळते, तेव्हा गोलंदाजही फलंदाजांसारखी खेळी करायची संधी सोडत नाहीत. जगभरातील कित्येक युवा आणि दिग्गज खेळाडूंनी भरलेल्या आयपीएलमध्ये असेही काही खेळाडू आहेत, ज्यांना ७०पेक्षा जास्त चेंडू खेळायला मिळूनही ते एकही षटकार मारु शकले नाहीत.

या लेखात अशा काही खेळाडूंचा आढावा घेण्यात आला आहे. विशेष म्हणजे, हे तिन्ही खेळाडू ऑस्ट्रेलिया संघाचे आहेत.

आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकणारे ३ खेळाडू     

3 Batsman Can’t Hit Single Six In IPL

मायकल क्लिंगर (Michael Klinger)

ऑस्ट्रेलियाचा खेळाडू मायकल क्लिंगरने आयपीएलच्या चौथ्या हंगामात कोची टस्कर्स केरळ संघाकडून ४ सामने खेळले होते. आयपीएल २०११मध्ये क्लिंगरला ७७ चेंडू खेळण्याची संधी मिळाली होती. मात्र, हा उजव्या हाताचा फलंदाज एवढ्या चेंडूत एकही षटकार मारण्यात यशस्वी ठरला नाही. विशेष म्हणजे, त्याने एक चौकारही मारला नव्हता. क्लिंगरने त्याच्या ४ सामन्याच्या आयपीएल कारकिर्दीत एकूण ७३ धावा केल्या होत्या.

मायकल क्लार्क (Michael Clarke)

ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार माइकल हा आयपीएलमध्ये फक्त ६ सामने खेळू शकला. तो २०१२मध्ये आयपीएलच्या पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा भाग होता. आयपीएलच्या  या ५व्या हंगामात क्लार्कने ९४ चेंडू खेळले होते. परंतु, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये उल्लेखनीय धावा करु शकणारा हा फलंदाज आयपीएलमध्ये एकही षटकार ठोकु शकला नाही. क्लार्कने ६ सामन्यात १२ चौकार मारत ९८ धावा केल्या होत्या.

कॅलम फर्ग्यूसन (Callum Ferguson)

ऑस्ट्रेलियाचा उजव्या हाताचा फलंदाज २०११ आणि २०१२मध्ये आयपीएलच्या पुणे वॉरियर्स इंडिया संघाचा भाग होता. त्याने ९ सामन्यात एकूण ११७ चेंडूंवर फलंदाजी केली होती. दरम्यान त्याने ९ चौकरांच्या मदतीने ९८ धावा केल्या होत्या. मात्र, या फलंदाजाला जवळपास २० षटकांमध्ये एका चेंडूवर एकही षटकार मारता आला नव्हता.

ट्रेंडिंग लेख-

३ असे क्रिकेटपटू; ज्यांचे मैदानावर जखमी होऊन झाले निधन, एक आहे भारतीय

८० पेक्षा जास्त सामने खेळून एकही षटकार मारु न शकलेले ३ भारतीय क्रिकेटर

खणखणीत षटकाराने कारकिर्दीत धावांचे खाते खोलणारे ५ क्रिकेटपटू, एक आहे भारतीय


Previous Post

फक्त दादाने होकार दिला तर ‘या’ २ देशांच्या क्रिकेटरचे मिटणार टेन्शन

Next Post

आयपीएल २०२०मध्ये चाहत्यांना मिस कराव्या लागणार या ५ अतिशय रोमांचक गोष्टी

Related Posts

Photo Courtesy: MS File Photo
टॉप बातम्या

ब्रेकिंग! तब्बल सात खेळाडू ठरले पद्मश्री पुरस्काराचे मानकरी, भारत सरकारने केली घोषणा

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

भारतात पोहचण्याआधीच इंग्लडला बसला धक्का, कठोर नियमांमुळे सरावासाठी मिळणार फक्त ‘इतके’ दिवस

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@cricket.com.au
टॉप बातम्या

भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेतील खेळपट्ट्यांना आयसीसीने दिली रेटिंग, ३६ धावांत भारताचा डाव आटोपलेली खेळपट्टी ठरली…

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

बेअरस्टोने केली ‘जादू’! चालू सामन्यात लाल चेंडूला बनवले पांढरे

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/ englandcricket
टॉप बातम्या

एका खेळीने दिग्गजांच्या मांदियाळीत सामील झाला रूट, केली ‘ही’ विक्रमी कामगिरी

January 25, 2021
Photo Courtesy: Twitter/@englandcricket
टॉप बातम्या

SL vs ENG : दुसर्‍या कसोटी सामन्यातही श्रीलंकेचा धुव्वा, इंग्लंडचे मालिकेत निर्भेळ यश

January 25, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल २०२०मध्ये चाहत्यांना मिस कराव्या लागणार या ५ अतिशय रोमांचक गोष्टी

Photo Courtesy: Twitter/IPL

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

Photo Courtesy: Twitter/IPL & ChennaiIPL

चेन्नई सुपर किंग्जने भारतीय क्रिकेट संघाला दिले हे ४ अफलातून खेळाडू

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.