fbpx
Sunday, January 17, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

फक्त दादाने होकार दिला तर ‘या’ २ देशांच्या क्रिकेटरचे मिटणार टेन्शन

England And Australia Players Requested BCCI To Reduce Quarantine Period

September 16, 2020
in क्रिकेट, Covid19, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/ ICC

Photo Courtesy: Twitter/ ICC


इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२०मध्ये सहभागी होणाऱ्या ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या क्रिकेटपटूंनी बीसीसीआयकडे विनंती केली आहे. त्यांचे म्हणणे असे आहे की, युएईला पोहोचल्यानंतर या दोन्ही देशांच्या क्रिकेटपटूंना ६ दिवसांऐवजी ३ दिवस क्वारंटाईनमध्ये ठेवण्यात यावे. जेणेकरुन आयपीएलच्या पहिल्या सामन्यापासून ते आपापल्या संघात सहभागी होऊ शकतील. England And Australia Players Requested BCCI To Reduce Quarantine Period

ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंग्लंड संघात चालू असलेली मर्यादित षटकांची मालिका आज (१६ सप्टेंबर) संपणार आहे. त्यामुळे उद्या या दोन्ही देशातील आयपीएलमध्ये सहभागी असणारे खेळाडू चार्टर्ड विमानद्वारे युएईला रवाना होतील. यावर्षी इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघातील एकूण २१ खेळाडू आयपीएलच्या वेगवेगळ्या संघांचा भाग आहेत.

बीसीसीआयच्या क्वारंटाईन नियमांनुसार या दोन्ही देशाचे खेळाडू २३ सप्टेंबरपासून संघात सहभागी होण्यासाठी उपलब्ध राहू शकतात. तर दूसऱ्या बाजूला आयपीएल २०२०ची सुरुवात १९ सप्टेंबरला होणार आहे. त्यामुळे त्यांनी बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीला विनंती केली आहे की, त्यांचा क्वारंटाईन कालावधी ६ दिवसांवरुन ३ दिवस करण्यात यावा.

माध्यमातील वृत्तांनुसार, बीसीसीआय अध्यक्ष गांगुलीला एक विनंती अर्ज प्राप्त झाला आहे. हा अर्ज इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया संघाच्या खेळाडूंच्या वतीने लिहिण्यात आलेला असू शकतो. या खेळाडूंना वाटत आहे की, ते आधीपासूनच इंग्लंडच्या जैव सुरक्षित वातावरणात खेळत आहेत. त्यामुळे एका जैव सुरक्षित वातावरणातून दूसऱ्या जैव सुरक्षित वातावरणात (युएईत) प्रवेश करण्याची त्यांना परवानगी दिली जावी. त्यांच्यापैकी कोणताही खेळाडू जैव सुरक्षित वातावरणाच्या बाहेर इतर दूसऱ्या व्यक्तींच्या संपर्कात आलेला नाही, असे त्यांचे म्हणणे आहे.

इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाचे खेळाडू साउथम्पटन आणि मॅनचेस्टर या ठिकाणी असलेल्या हिल्टन हॉटेलमध्ये थांबले आहेत. हे हॉटेल एका स्टेडियमचा भाग आहे. तिथे त्यांची दर ५व्या दिवशी चाचणी करण्यात येत आहे. एवढेच नव्हे तर, ब्रिटनवरुन जेव्हा ते युएईला रवाना होतील, तेव्हाही त्यांंची चाचणी करण्यात येईल. युएईला पोहोचल्यानंतरही त्यांची पहिल्या आणि तिसऱ्या दिवशी कोरोना चाचणी करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

टी२० विश्वचषक तर आम्ही जिंकणारच, आयपीएलमध्ये खेळणाऱ्या क्रिकेटरने व्यक्त केला आत्मविश्वास

धोनीची सीएसकेतील विकेटकिपरची जागा घ्यायला २४ वर्षीय खतरनाक फटकेबाज तयार

बापाच्या पावलावर पाऊल ठेवत अष्टपैलू झालेला क्रिकेटर स्मिथच्या राजस्थानच्या ताफ्यात दाखल

ट्रेंडिंग लेख –

काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

आयपीएल २०२० मध्ये अशा असू शकतात सर्व संघांच्या सलामी जोड्या, ज्या ठरु शकतात सुपर हिट


Previous Post

१२२ वनडे खेळून एकही शतक, एकही सामनावीर पुरस्कार न मिळालेला क्रिकेटर पुढे झाला वकिल

Next Post

आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@MumbaiCityFC
टॉप बातम्या

आयएसएल २०२० : चुरशीच्या लढतीत मुंबई-हैदराबाद गोलशून्य बरोबरी

January 17, 2021
टॉप बातम्या

अबब! भारताने एकाच मालिकेत खेळवले तब्बल ‘इतके’ खेळाडू

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

दक्षिण आफ्रिकेच्या मालिकेपूर्वी मिसबाह-उल-हकने मांडले मत , म्हणाला आमचा संघ ‘या’ गोष्टीचा घेईल फायदा

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

नटराजन आणि वॉशिंग्टन सुंदरचे ‘या’ ऑस्ट्रेलियन प्रशिक्षकाने केले कौतुक, म्हणाले…

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

ब्रिस्बेन कसोटीच्या दुसऱ्या दिवशी भारतीय संघाला भोवल्या ‘या’ दोन चुका

January 17, 2021
Photo Courtesy: Twitter/@BCCI
टॉप बातम्या

रोहितच्या विकेटचे सोशल मिडीयावर उमटले पडसाद, ट्विटरवर ‘अशा’ आल्या प्रतिक्रिया

January 16, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/ IPL

आयपीएलमध्ये एकही षटकार न मारु शकलेले ३ फलंदाज

Photo Courtesy: Twitter/IPL

आयपीएल २०२०मध्ये चाहत्यांना मिस कराव्या लागणार या ५ अतिशय रोमांचक गोष्टी

Photo Courtesy: Twitter/IPL

युएईत होत असलेल्या आयपीएलचा या ४ संघांना होणार मोठा फायदा

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.