fbpx
Saturday, January 23, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

September 16, 2020
in क्रिकेट, टॉप बातम्या
0

क्रिकेटच्या मैदानावर पंच हे सर्वाधिक विश्वासार्ह व्यक्ती असतात. संपूर्ण सामना क्रिकेटच्या नियमांना धरून पार पाडण्याचे काम हे पंच करत असतात. डेव्हिड शेफर्ड, डिकी बर्ड, सायमन टॉफेल, अलीम दार या पंचांनी आपल्या निरपेक्ष पंचगिरीने क्रिकेटच्या इतिहासात मानाचे स्थान मिळवले आहे. दुसरीकडे, स्टीव बकनर, डेरिल हेअर, डॅरिल हार्पर‌ हे पंच कायमच वादग्रस्त राहिले. याव्यतिरिक्त, दोन असे पंच होते, जे आपल्या चुकीच्या निर्णयांसाठी कायम चर्चेत राहिले. ते दोन पंच म्हणजे स्टीव डून व डेव्ह ओरचार्ड.

१९९९ च्या भारत-पाकिस्तान दरम्यानच्या, ऐतिहासिक चेन्नई कसोटीत डून यांनी भारतीय कर्णधार मोहम्मद अजहरुद्दिनला उजव्या यष्टीच्या फूटभर बाहेर पडलेल्या चेंडूवर विवादास्पदरित्या पायचीत बाद दिले होते. त्याच सामन्यात, मोईन खानने सौरव गांगुलीचा एक टप्पा पडल्यानंतर पकडलेला झेल डून यांनी ग्राह्य धरला होता.

त्याच वर्षी, उभय संघातील एशियन टेस्ट चॅम्पियनशिपच्या ईडन गार्डन्सवरील सामना देखील विवादित होता. यावेळी, डेव्ह ओरचार्ड व कायमच भारतीय संघाच्या विरोधात निर्णय देणारे स्टीव बकनर हे पंचगिरी करत होते. ओरचार्ड यांनी भारताच्या दोन्ही सलामीवीरांना चुकीच्या पद्धतीने पायचित बाद दिले तसेच सचिन तेंडुलकरला विवादितरित्या धावबाद दिल्याने अनेक प्रेक्षक मैदानात दाखल झाले होते. अशाप्रकारे, डून व ओरचार्ड यांनी अनेकदा पंचगिरीला काळिमा फासण्याचे काम केले.

१९९९ मध्ये डून व ओरचार्ड हे एकत्रितपणे वेस्टइंडीज व पाकिस्तान विरुद्धच्या टोरंटो येथील एकदिवसीय मालिकेत पंचांचे काम पाहत होते. मालिकेतील तिसऱ्या सामन्यात या दोन्ही पंचांनी बेजबाबदार पंचगिरीचा सर्वोत्तम नमुना सादर केला होता.

वेस्ट इंडिजचा कर्णधार ब्रायन लाराने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. दुसऱ्याच षटकात शब्बीर अहमदने ऍण्ड्रीयन ग्रिफिथला बाद करत पाकिस्तानला पहिले यश मिळवून दिले. पाकिस्तानसाठी तिसरे षटक टाकताना अब्दुल रज्जाकने सात चेंडू टाकले, मात्र ही गोष्ट पंच ओरचार्ड यांच्या निदर्शनास आली नाही.

ओरचार्ड यांनी रज्जाकच्या सात चेंडूंच्या षटकाकडे दुर्लक्ष केले अगदी तसेच दुर्लक्ष डून यांनी पाकिस्तानच्या डावाच्या १७ व्या षटकात केले. वेस्ट इंडिजचा वेगवान गोलंदाज मर्विन डिलन याने त्या षटकात ७ चेंडू टाकले.

दोन्ही पंचांनी एक-एक अक्षम्य चूक केली असताना डून यांनी ख्रिस गेलने टाकलेल्या ३१ व्या षटकात किती चेंडू टाकलेत हे मोजले नाही. यावेळीसुद्धा त्या षटकात ७ चेंडू टाकले गेले होते. अशाप्रकारे, दोन्ही पंचांनी खराब कामगिरीचा एक आदर्श वस्तुपाठ सादर केला.

सुदैवाने, हा सामना तितकासा अटीतटीचा झाला नाही. वेस्ट इंडीजने दिलेले १६२ धावांचे आव्हान पाकिस्तानने चाळीसाव्या षटकात तीन गडी गमावत पूर्ण केले.


Previous Post

भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

Next Post

अन् वैतागलेल्या सचिनने करियरमध्ये पहिल्यांदाच आपटली बॅट

Related Posts

क्रिकेट

अन् डॉन ब्रॅडमन भारताच्या महान फलंदाजाला शिवसेना व बाळासाहेबांबद्दल विचारत होते…

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ IndSuperLeague
टॉप बातम्या

आयएसएल २०२०-२१ : ईस्ट बंगालला हरवित मुंबई सिटीची घोडदौड कायम

January 23, 2021
Photo Courtesy: www.iplt20.com
क्रिकेट

“मला कोहलीच्या विरुद्ध काही बोलायचे नाही, परंतु…” गौतम गंभीरची विराटवर टीका

January 23, 2021
क्रिकेट

आर आश्विनने भारतीय संघाचे प्रशिक्षक रवि शास्त्रींची केली नक्कल, बघा व्हिडिओ 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/BCCI
क्रिकेट

मोहम्मद सिराजला ५ विकेट्स मिळाव्या म्हणून ‘या’ खेळाडूने देवाकडे केली होती प्रार्थना 

January 23, 2021
Photo Courtesy: Twitter/ICC
क्रिकेट

विराट ऐवजी अजिंक्य रहाणेला करा कसोटी संघाचा कर्णधार, इंग्लंडच्या दिग्गजाची मागणी

January 23, 2021
Next Post
Photo Courtesy: Twitter/

अन् वैतागलेल्या सचिनने करियरमध्ये पहिल्यांदाच आपटली बॅट

Photo Courtesy: Twitter/ ipl

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals

बापाच्या पावलावर पाऊल ठेवत अष्टपैलू झालेला क्रिकेटर स्मिथच्या राजस्थानच्या ताफ्यात दाखल

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.