fbpx
Thursday, January 21, 2021
Maha Sports
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू
No Result
View All Result
Maha Sports
No Result
View All Result
ADVERTISEMENT

भल्याभल्या गोलंदाजांना रडवणारा द्रविड ‘त्याची’ खेळी पाहून आला होता रडकुंडीला

The Incident Of Inaugural Match Of IPL Between KKR And RCB

September 16, 2020
in क्रिकेट, IPL, टॉप बातम्या
0
Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals

Photo Courtesy: Twitter/rajasthanroyals


२०१८ साल… भारतीय ‘द वॉल’ म्हणून ओळखला जाणारा राहुल द्रविडने क्रिकेटची वेबसाइट ईएसपीएन क्रिकेटइन्फोला एक मुलाखत दिली होती. बोलताना द्रविडने न्यूझीलंडचा माजी कर्णधार ब्रेंडम मॅक्यूलम याच्यासोबतच्या आठवणींना उजाळा दिला होता. द्रविड जोर देत म्हणाला होता की, “तो एक प्रकारचा ‘टॉर्चर’ होता. पण, सुदैवाने तो टॉर्चर फक्त दीड तासात संपला.”

‘टॉर्चर’… तोही भारताचा महान कसोटी फलंदाजांपैकी एक असणाऱ्या द्रविडला… ती अशी कोणती खेळी होती?, ज्याला द्रविड चक्क टॉर्चर असे संबोधत होता! विचारात पडलात ना… त्या खेळीविषयी जाणून घ्यायचे असेल तर चला भूतकाळात जाऊ… १३ वर्ष मागे, जिथून याची सुरुवात झाली होती.

पहिले वर्ष होते २००७. यावर्षी  भारतीय क्रिकेटमध्ये २ महत्त्वपूर्ण घटना घडल्या होत्या. एक म्हणजे वनडे विश्वचषक आणि दूसरी म्हणजे टी२० विश्वचषक.

१३ मार्च २००७ला वनडे विश्वचषकाची सुरुवात झाली आणि अगदी १० दिवसांत भारतीय क्रिकेट संघ विश्वचषकातून बाहेर पडला. साखळी फेरीत बांग्लादेश आणि श्रीलंका संघांनी भारताच्या केलेल्या दारुण पराभवामुळे संघाला बाहेरचा रस्ता पकडावा लागला होता. निराश चाहत्यांनी भारतीय खेळाडूंचे पुतळे जाळले. काही खेळाडूंच्या घरावर दगडफेक करण्यात आली. चाहत्यांच्या रोषामुळे भारतीय क्रिकेटपटूंना अक्षरश: तोंड लपवून भारतात परतावे लागले होते.

पण या परिस्थितीने ६ महिन्यांच्या आतच एक वेगळे वळण घेतले होते. कारण पहिल्यांदा क्रिकेटजगतात टी२० विश्वचषकाचे बिगुल वाजले होते. पण भारतीय संघातील सौरव गांगुली, राहुल द्रविड आणि सचिन तेंडूलकर या अनुभवी खेळाडूंच्या तिकडीने क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरुपात खेळण्यास नकार दिला होता. त्यामुळे बीसीसीआयला युवा खेळाडूंनी भरलेल्या नव्या संघाला मैदानावर उतरवावे लागले.

लांब केस, शांत स्वभाव, चपळता, मैदानावर संघासाठी निर्णय घेण्याची क्षमता, कोणत्याही गोलंदाजाच्या चेंडूला सीमारेषेबाहेर मारण्याची दमदार शैली असणाऱ्या एमएस धोनीवर संघाचे नेतृत्त्व सोपवण्यात आले होते. मजेची गोष्ट ही होती की, संघासाठी एकही प्रशिक्षक उपलब्ध नव्हता. फक्त एक वरिष्ठ संघ व्यवस्थापक होते, ते म्हणजे लालचंद राजपूत. एकंदरीत भारताच्या क्रिकेट क्षेत्रातील कोणत्याही व्यक्तीला आणि चाहत्यांना टी२० विश्वचषकाची काहीच उत्सुकता नव्हती. पण ११ सप्टेंबरचा दिवस उजाडला आणि पाहता पाहता भारतीय टी२० संघाने अंतिम सामन्यात पाकिस्तानला पराभूत करत पहिल्याच वर्षात टी२० विश्वचषक पटकावला.

भारतीय टी२० संघाच्या या दणदणीत विजयाने फक्त भारतीय क्रिकेट नव्हे तर पूर्ण क्रिकेटविश्वाचे स्वरुप बदलून टाकले. भारतीय चाहत्यांच्या मनात क्रिकेटच्या या सर्वात छोट्या स्वरुपाने घर करायला सुरुवात केली होती. अशात बीसीसीआयचे माजी चेयरमन ललित मोदी यांच्या डोक्यात टी२० स्वरुपातील लीग सुरु करण्याची कल्पना आली.

मनात भिती होती की, ही कल्पना यशस्वी ठरेल का नाही? पण तरीही भविष्याचा जास्त विचार न करता, बीसीसीआयने या टी२० लीगवर चिक्कार पैसा खर्च केला. मोठमोठ्या सेलेब्रिटींना बोलावून धमाकेदार उद्घाटन सोहळा आयोजण्यात आला. सामन्यादरम्यान चीयरलीडर्स, सामन्यानंतर मोठमोठ्या पार्टींचे आयोजन, भारतीय खेळाडूंसह परदेशी खेळाडूंचा गाजावाजा. भारतीय क्रिकेटमध्ये पहिल्यांदाच हे सर्वकाही घडत होते आणि या सर्वासाठी कारणीभूत होती, २० षटकांची ‘इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल)’…

१८ एप्रिल २००८, आयपीएलच्या पहिल्या सामन्याचा दिवस. बेंगलोरच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर या सामन्याचे आयोजन करण्यात आले होते. कोलकाता नाईट रायडर्स (केकेआर) आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर (आरसीबी) हे २ संघ मैदानावर उतरले होते. कुतुहलाची बाब म्हणजे, टी२० विश्वचषकात सहभाग नोंदवण्यास नकार दिलेले सौरव गांगुली आणि राहुल द्रविड या सामन्यात खेळणार होते. ते पण खेळाडू म्हणून नव्हे तर संघांचे कर्णधार म्हणून. गांगुली शाहरुख खानच्या केकेआरची कमान सांभाळत होता आणि द्रविड विजय माल्याच्या आरसीबीची.

सामन्याची वेळ झाली. पंच आले. नाणेफेक झाली आणि आरसीबीचा कर्णधार द्रविडने नाणेफेक जिंकत प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. म्हणजे केकेआर संघ पहिल्यांदा फलंदाजी करणार होता. कर्णधार गांगुली ब्रेंडन मॅक्यूलमला घेऊन सलामीला फलंदाजी करण्यासाठी मैदानावर उतरला. सामन्यातील पहिले षटक टाकण्यासाठी केकेआरचा प्रविण कुमार आला आणि त्याने आपल्या पूर्ण षटकात मॅक्यूलमला खाते उघडण्याची संधी दिली नाही. पण त्यानंतर मॅक्यूलम असा खेळला की, त्याने आरसीबीच्या नाकी नऊ आणून सोडली.

मॅक्यूलमच्या फलंदाजीचा पहिला शिकार बनला झहीर खान. एकट्या मॅक्यूलमने झहीरच्या गोलंदाजीवर ३ चौकार आणि एक जोरदार षटकार ठोकले. मॅक्यूलमने प्रविण कुमारपासून जॅक्स कॅलिसपर्यंत कुणालाही सोडले नाही. भारतीय चाहत्यांनी गजबजलेल्या एम चिन्नास्वामी स्टेडियममध्ये सर्वत्र मॅक्यूलम मॅक्यूलम नारेबाजी होत होती. मॅक्यूलमने सर्वाधिक धुलाई केली होती, जॅक्स कॅलिसची. त्याच्या ४ षटकात त्याने ४८ धावा कुटल्या होत्या.

डावातील ७व्या चेंडूवर आपल्या फलंदाजीचे खाते खोलणाऱ्या मॅक्यूलमने डावाअखेर नाबाद राहत ७३ चेंडूत १५८ धावा केल्या होत्या. यामध्ये १० चौकारांचा आणि १३ षटकारांचा समावेश होता. पहिला आयपीएल सामना आणि त्यात दिडशतकी खेळी, हे पाहून विरुद्ध आरसीबी संघाचा कर्णधार द्रविड रडकुंडीला आला होता.

मॅक्यूलमच्या दिडशतकी खेळीच्या जोरावर केकेआरने आरसीबीला २२३ धावांचे आव्हान दिले होते. आरसीबी केकेआरच्या आव्हानाचा पाठलाग करताना १५.१ षटकात फक्त ८२ धावांवर सर्वबाद झाला होता.  अशाप्रकारे पहिल्याच आयपीएल सामन्यात द्रविडचा संघ १४० धावांनी पराभूत झाला होता. द्रविडच्या कारकिर्दीतील तो सर्वात दारुण पराभव होता. याउलट मॅक्यूलमची ती टी२० कारकिर्दीतील सर्वोत्कृष्ट खेळी ठरली होती.

मॅक्यूलमच्या या डावातील खेळीलाच द्रविडने १० वर्षांनतर (२०१८) ‘टॉर्चर’ असे संबोधले होते. अजूनही द्रविड मॅक्यूलमच्या त्या फटकेबाजीला विसरू शकला नसेल.

हे सर्व झाले, पण मॅक्यूलमसारखे अनेक दमदार फलंदाज आयपीएल इतिहासात होऊन गेले आणि आहेत. आणि अशा दमदार खेळाडूंच्या अतुलनीय खेळीच आयपीएलचा आरसा आहेत. अशा खेळाडूंच्या अफलातून कामगिरीमुळेच आयपीएलची ख्याती जगभरात परसली आहे.

ट्रेंडिंग लेख –

…आणि वडिलांचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी रांचीच्या त्या खेळाडूने केली क्रिकेट खेळायला सुरुवात

सावंतवाडीचा नाईक युएईत षटकार चौकारांची बरसात करणार

‘त्या’ भावासाठी धावून आली बहीण! आता आयपीएल गाजवून देणार भाऊबीजेची खास भेट

महत्त्वाच्या बातम्या –

मुंबई इंडियन्स सोडून इतर सात आयपीएल फ्रेंचाइजी संघांना बसणार ‘हा’ मोठा झटका

आयपीएलची तयारी पाहून सौरव गांगुली खूष; चक्क स्टेडियमवर जाऊन…

भारताबरोबर मालिका न झाल्याने पाकिस्तानचे झाले तब्बल एवढ्या कोटींचे नुकसान


Previous Post

या संघाचा प्रतिभावान खेळाडू म्हणतो, ‘धोनीसारखेच मलाही चांगला फिनिशर बनायचे आहे’

Next Post

काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

Related Posts

Photo Courtesy: Twitter/@BCCI
क्रिकेट

“…म्हणून माझ्या मनात मोहम्मद सिराज बद्दल सन्मान आहे”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराचे वक्तव्य  

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
टॉप बातम्या

“भारतीय संघातील पुजाराचे महत्व अनन्यसाधारण”, ऑस्ट्रेलियाच्या माजी कर्णधाराने केले कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/BBL
क्रिकेट

व्हिडिओ: धाव घेताना फलंदाजाची गोलंदाजांशी घातक टक्कर, त्यानंतर घडलं असं काही की तुम्ही कराल कौतुक

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/ virendersehwag
क्रिकेट

स्वागत नहीं करोगे? आपल्या गावात परतल्यानंतर टी नटराजनचे मिरवणूक काढून जंगी स्वागत

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@ICC
क्रिकेट

भारतीय संघाला मोठा धक्का! इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेतून ‘हा’ प्रमुख खेळाडू बाहेर 

January 21, 2021
Photo Courtesy: Twitter/@KKRiders
टॉप बातम्या

“आयपीएल २०२१ मध्ये कोलकाताचा संघ सर्वोत्तम प्रदर्शन करेल”, प्रशिक्षकांनी व्यक्त केला विश्वास

January 21, 2021
Next Post

काय सांगता! एकाच सामन्यात टाकल्या गेल्या होत्या चक्क ७ चेंडूंच्या ३ ओव्हर

Photo Courtesy: Twitter/

अन् वैतागलेल्या सचिनने करियरमध्ये पहिल्यांदाच आपटली बॅट

Photo Courtesy: Twitter/ ipl

आजच्या दिवसातील क्रिकेटमधील ठळक व महत्त्वाच्या घडामोडी वाचा फक्त २ मिनिटांत…

ADVERTISEMENT
Maha Sports

© 2020.

Navigate Site

  • About Us

Follow Us

No Result
View All Result
  • क्रिकेट
  • कबड्डी
  • फुटबॉल
  • टेनिस
  • बॅडमिंटन
  • कुस्ती
  • हॉकी
  • अन्य खेळ
  • ब्लॉग
  • खेळाडू

© 2020.