आयपीएल २०२२ मध्ये मंगळवारी (१२ एप्रिल) रात्री रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यात आमना सामना होईल. हा सामना मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर खेळला जाईल. सामन्याच्या आधी सराव सत्रात एक कौटुंबिक वातावरण पाहायला मिळाले. विराट कोहली आणि एमएस धोनीची जोडी पुन्हा एकदा एकत्र आणि आनंदात दिसली. तसेच सीएकेचा माजी सलामीवीर खेळाडू फाफ डू प्लेसिस त्याच्या जुन्या सहकाऱ्यांना भेटून आनंदी दिसला आहे.
सीएसकेला मागच्या आयपीएल हंगामात विजेतेपद मिळवून देण्यात दक्षिण अफ्रिकी दिग्गज फाफ डू प्लेसिस (Faf Du Plesis) याचे योगदान महत्वपूर्ण राहिले. पण मेगा लिलावात संघ त्याला खरेदी करू शकला नाही. आरसीबीने मेगा लिलावात डू प्लेसिसला खरेदी केले आणि संघाचा कर्णधार देखील बनवले. अशात सीएसकेविरुद्ध हंगामातील पहिला सामना खेळण्यापूर्वी डू प्लेसिसच्या डोळ्यांमध्ये जुन्या सहकाऱ्यांना भेटण्याचे समाधान स्पष्टपणे दिसत होते. सीएसकेने त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. व्हिडिओत एमएस धोनी (MS Dhoni), विराट कोहली (Virat Kohli) आणि इतर खेळाडूही एकमेकांच्या गाठीभेटी घेत आहेत.
https://www.instagram.com/reel/CcPdQvcFR3F/?utm_source=ig_web_copy_link
Faf Du Plessis hugs his former captain MS Dhoni during today's practice sessions. pic.twitter.com/d6OWeuk0XK
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 11, 2022
सराव सत्रात विराट कोहलीला भेटल्यानंतर एमएस धोनी आनंदात दिसला. मैदानात विराट आणि धोनीमध्ये चेष्टा मस्करी चालल्याचे दिसत आहे. विराटने धोनीच्या नेतृत्वात भारतीय संघासाठी अनेक सामन्यांमध्ये प्रतिनिधित्व केले आहे. दोघांमध्ये चांगली मैत्री देखील आहे. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याआधी विराटमध्ये नेतृत्वाचे सर्व कौशल्य तयार केले होते. परंतु आता विराट देखील कर्णधारपदावरून पायउतार झाला आहे. त्याने आरसीबीचे देखील कर्णधारपद सोडले असून, याच कारणास्तव डू प्लेसिसवर ही जबाबदारी आली आहे.
Virat Kohli, MS Dhoni and DJ Bravo meets in today's practice sessions. pic.twitter.com/h75yxffW2v
— Tanuj Singh (@ImTanujSingh) April 11, 2022
Their bond 🥰❤️💛#cskvsrcb #IPL2022 pic.twitter.com/UDtG5IHISf
— 𝙇𝙚𝙤ᶜˢᵏ💛 (@224vsaus) April 11, 2022
त्याव्यितिरिक्त व्हिडिओत सीएसकेचा कर्णधार रवींद्र जडेजा, ड्वेन ब्रावो आणि इतर खेळाडूही एकमेकांशी चर्चा करताना दिसत आहेत. मागच्या आयपीएल हंगामात सीएसकेने जरी विजेतेपद पटकावले असले, तरी या हंगामात संघासाठी अशी कामगिरी करणे सोपी नसेल. सीएसकेने हंगामातील सुरुवातीचे तिन्ही सामने गमावले आहेत आणि संघ अजूनही पहिल्या विजयाच्या प्रतिक्षेत आहे. तर दुसरीकडे आरसीबी मात्र चांगल्या फॉर्ममध्ये दिसत आहे. आरसीबीने खेळलेल्या चार सामन्यांपैकी ३ जिंकले आहेत आणि संघ गुणतालिकेत तिसऱ्या स्थानावर आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
IPL 2022 | मुंबई, पुणे नव्हे तर ‘या’ ठिकाणी रंगणार प्लेऑफ सामने, फायनल अहमदाबादमध्ये होण्याची शक्यता
हार्दिकच्या डोक्यावर लागला खतरनाक बाऊंसर, पाहून पत्नी नताशा आली टेंशनमध्ये; Video व्हायरल
Video: अभिनव मनोहरवर हैदराबादच्या खेळाडूंची कृपा, चक्क ३ कॅच सोडल्यानंतर फलंदाजालाही फुटलं हसू