मुंबईच्या वानखेडे स्टेडियमवर, शुक्रवारी (१६ एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि पंजाब किंग्ज या संघांमध्ये सामना पार पडला. या सामन्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाने ६ गडी राखून जोरदार विजय मिळवला. तसेच या सामन्यात पंजाब किंग्ज संघाकडून शाहरुख खानने महत्वाची खेळी केली. सामना झाल्यानंत चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने शाहरुख खानच्या कानात काय म्हटले होते? याबाबत खुलासा केला आहे.
चेन्नई सुपर किंग्ज संघाने नाणेफेक जिंकून पंजाब किंग्ज संघाला प्रथम फलंदाजी करण्याचे आमंत्रण दिले होते. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या पंजाब संघाला सुरुवातीलाच दीपक चहरने मोठे धक्के दिले होते. त्यांनतर शाहरुख खानने ३६ चेंडूत ४७ धावांची खेळी केली होती.
या खेळीदरम्यान एका चेंडूवर शाहरुख खान बाद झाल्याचे वाटल्याने चेन्नईच्या खेळाडूंंनी अंपायरकडे जोरदार मागणी केली होती. ती मागणी अंपायरने फेटाळून लावली होती. त्यानंतर यष्टीमागे उभा असलेला धोनी शाहरुखच्या जवळ जाऊन त्याच्या कानात काही तरी कुजबुजला होता.
सामन्यानंतर एका मुलाखतीत धोनीने याबद्दल सांगितले की, “आम्ही खूप जोरदार मागणी केली होती. त्यानंतर मी त्याच्याजवळ गेलो आणि कानाजवळ जाऊन म्हटले की, आम्ही डीआरएस नाही घेत आहोत.”
तसेच धोनीने खेळपट्टीचे कौतुक करत म्हटले की, “मला असे वाटते की, २०११ मध्ये ती शेवटची वेळ होती जेव्हा आम्ही चेन्नईच्या खेळपट्टीवर समाधानी होतो. तेव्हापासून ग्राउंड्समन खूप मेहनत घेत आहेत, त्या खेळपट्टीवर परंतु चेंडू योग्यरीत्या बॅटवर येत नाही. मात्र मुंबईची खेळपट्टी अतिशय चांगली असून यावर बऱ्याच धावाही करता येतात.
तसेच तो पुढे म्हणाला की, “आता आमची गोलंदाजी आधीपेक्षाही अधिक धारदार झाली आहे. आमच्या गोलंदाजांना स्विंग, बाऊन्स मिळत आहे. आमच्यासाठी पावरप्लेमध्ये चहर एक चांगला गोलंदाज म्हणून विकसित होत आहे. गोलंदाजी युनिट म्हणून आमच्याकडे अधिक संसाधने आहेत. मला सुरुवातीलाच प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर गोलंदाजी आक्रमण करायचे होते, म्हणून चहरकडून मी चार षटक गोलंदाजी करून घेतली.”
महत्त्वाच्या बातम्या-
CSKvPBKS: कोण आहेत हे माय-लेक, ज्यांनी लाखो सामना दर्शकांचे वेधले लक्ष? घ्या जाणून
‘कर्णधार माझ्या पाठीशी, म्हणूनचं चांगली कामगिरी करु शकलो,’ सामनावीर चहरचे मनाला भावणारे वक्तव्य
आशीर्वाद लाखाचा! सामन्यापुर्वी चाहर शमीच्या पाया पडला अन् मैदान मारलं, पाहा तो नेत्रदिपक क्षण