रविवारी (14 एप्रिल) चेन्नई सुपर किंग्ज आणि मुंबई इंडियन्स यांच्यात आयपीएल 2024 चा 29वा सामना रंगणार आहे. या सामन्याआधी एमएस धोनी आणि रोहित शर्माचा एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोत या दोघांसोबत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरही दिसत आहे.
सोशल मीडियावर व्हायरल होत असलेला हा फोटो एका ॲड शूटमधील असल्याचा दावा केला जातोय. चाहते मात्र या तिन्ही महान भारतीय क्रिकेटपटूंना एकाच फ्रेममध्ये पाहून चांगलेच रोमांचित झाले आहेत. हा फोटो गेल्या दोन दिवसांपासून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या फोटोबाबत चाहत्यांमध्ये चांगलीच उत्सुकता लागली असून ते यावर वेगवेगळ्या कमेंट करत आहेत.
Sachin, Dhoni, Rohit together in Mumbai. [Dhoni Fans Telugu]
– Reunion of 3 Greats of India. ⭐ pic.twitter.com/MRhhXwoGgW
— Johns. (@CricCrazyJohns) April 12, 2024
एमएस धोनीनं आयपीएलपूर्वीच कर्णधारपद सोडलं होतं. त्याचवेळी मुंबई इंडियन्सनं रोहित शर्माला कर्णधारपदावरून हटवून त्याच्या जागी हार्दिक पांड्याकडे ही जबाबदारी सोपवली आहे. या सगळ्याशिवाय सचिन तेंडुलकर सध्या मुंबई इंडियन्सच्या मेंटरच्या भूमिकेत आहे. या आयपीएलमध्ये धोनी कर्णधार नसला तरी तो त्याच्या लांब केसांमुळे आणि अखेरच्या काही षटकांमध्ये मारलेल्या मोठमोठ्या फटक्यांमुळे सतत चर्चेत आहे.
आयपीएलच्या या हंगामातील मुंबई आणि चेन्नईच्या कामगिरीबद्दल बोलायचं झालं तर, मुंबईनं पुन्हा एकदा संथ सुरुवात केलेली आहे. पहिले तीन सामने गमावल्यानंतर टीमनं घरच्या मैदानावर सलग दोन्ही सामने जिंकले. गेल्या सामन्यात मुंबईनं रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा अगदी सहज पराभव केला होता. मुंबई गुणतालिकेत 4 गुणांसह सातव्या क्रमांकावर आहे.
दुसरीकडे, चेन्नईनं या हंगामात पाचपैकी तीन सामने जिंकले असून दोन सामने गमावले आहेत. ते गुणतालिकेत 6 गुणांसह तिसऱ्या स्थानी आहेत. आता हा सामना जिंकून 2 गुण मिळवण्याचं दोन्ही संघांचं लक्ष्य असेल. चेन्नईला गुणतालिकेत आपलं स्थान आणखी मजबूत करायचं आहे, तर मुंबईला आपली विजयी मालिका खंडित होऊ द्यायची नाही. त्यामुळे दोन्ही संघांसाठी हा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
विजय दिल्लीचा, पराभव लखनऊचा पण दणका बसला बंगळुरुला! नेमकं काय घडलंय? आरसीबीसाठी यंदाही वाटचाल कठीण