भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीचे (MS Dhoni) जगभरात लाखो चाहते आहेत. त्यामुळे तो भारतातील एक मोठा सेलिब्रेटी म्हणूनही ओळखला जातो. नुकत्याच YouGov द्वारा केलेल्या एका सर्व्हेनुसार धोनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनंतर(Narendra Modi) भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा प्रशंसनीय व्यक्ती (most admired men) ठरला आहे.
YouGovने जगभरातील सर्वाधित प्रशंसनीय व्यक्तींची यादी तयार करण्यासाठी 41 देशातील जवळपास 42000 व्यक्तींचा सर्व्हे केला आहे. यामध्ये त्यांनी पुरुष आणि महिला यांची वेगवेगळी यादी केली आहे.
जगभरातील प्रशंसनीय पुरुषांच्या यादीत अव्वल क्रमांकावर बिल गेट्स आहेत. तर महिलांच्या यादीत मिशेल ओबामा आहे.
मोदी भारतातील सर्वाधिक प्रशंसनीय पुरुष ठरले असून भारताची स्टार बॉक्सर मेरी कोम(Mary Kom) देशातील सर्वाधिक प्रशंसनीय महिला ठरली आहे.
या सर्व्हेनुसार मोदींना 15.66% रेटिंग मिळले आहेत. त्यांच्या पाठोपाठ धोनीला 8.58% रेटिंग आहेत. या यादीत रतन टाटा 8.02% रेटिंगसह तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
धोनीपाठोपाठ खेळाडूंमध्ये सचिन तेंडूलकर(5.81%), विराट कोहली(4.46%), ख्रिस्तियानो रोनाल्डो(2.95%), लिओनेल मेस्सी (2.32%) आहेत.
महिलांमध्ये मेरी कोम(10.36%) ही एकमेव भारतीय महिला खेळाडू पहिल्या 25 मध्ये आहे. तिच्या पाठोपाठ भारताच्या किरण बेदी (9.46%) , लता मंगेशकर (9.23%), सुष्मा स्वराज (7.13%), आणि दिपिका पदुकोण (6.35%) आहेत.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–टी२० क्रमवारी: कोहली, शिखर नाही तर हिटमॅन रोहित शर्मासह केवळ हा भारतीय आहे टॉप १०मध्ये
–मुलाखत: ऑलिंपिक मेडल एकदिवस नक्कीच जिंकणार – राहुल आवारे
-अखेर टीम इंडियाच्या मदतीला धावून आला हा मोठा संघ