भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर त्याचे खेळणे काही थांबवले नाही. धोनीने केवळ क्रिकेटमध्येच नाही तर जेथे आपला हात आजमावतो तेथे तो यश मिळवतो. धोनी क्रिकेटनंतर टेनिस कोर्टवर देखील उत्तम कामगिरी प्रदर्शित करत आहे. त्याने झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन टेनिस चॅम्पियनशीप 2022च्या दुहेरीचे विजेतेपद जिंकले आहे. या स्पर्धेत त्याचा साथीदार सुमीतकुमार बजाज होता.
एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुमीत कुमार बजाज (Sumeetkumar Bajaj) यांनी अंतिम फेरीत खनैया-रोहित जोडीला पराभूत करत झारखंड स्टेट क्रिकेट असोसिएशन टेनिस चॅम्पियनशीप 2022च्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले. कमी प्रकाशामुळे हा सामना काही काळासाठी थांबवण्यात आला होता, तेव्हा धोनी-बजाज जोडी 6-2 अशी आघाडीवर होती. त्यानंतर उर्वरित दोन सेटचा गेम दुसऱ्या दिवशी पूर्ण करण्यात आला. ज्यामध्ये धोनी-बजाज जोडीने बाजी मारली.
सुमीतने या स्पर्धेच्या विजेतेपद आणि धोनीसोबत इंस्टाग्रामवर एक फोटोही पोस्ट केला आहे. ज्याच्या कॅप्शनमध्ये त्याने लिहिले, ‘शेवटी माझे स्वप्न पूर्ण झाले. 2018, 2019 आणि 2022 सह हॅट्ट्रीक पूर्ण. धन्यवाद धोनी सर’
https://www.instagram.com/p/ClAkkV-S33m/?utm_source=ig_web_copy_link
ही स्पर्धा रांचीच्या कंट्री क्रिकेट क्लबमध्ये खेळली गेली. टेनिसच्या कोर्टवर उत्तम कामगिरी करण्याची धोनीची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही त्याने बजाजसोबत तीन सामने खेळले. धोनीला टेनिस खेळणे खूप आवडते. यासाठी तो नेहमीच झारखंडच्या आंतरराष्ट्रीय स्टेडियमच्या ठिकाणी टेनिस खेळताना दिसतो.
आयपीएल 2023मध्ये चेन्नई सुपर किंग्जचे नेतृत्व धोनीच करणार आहे, असे संघाच्या अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे. मागील हंगामात त्याने रवींद्र जडेजा याला नेतृत्व सोपवले होते, मात्र त्याने निराशा केल्याने परत धोनीकडे कर्णधारपद आले आणि संघ लवकरच स्पर्धेतून बाहेर झाल.
धोनीने सीएसकेचे कर्णधारपद भुषविताना चार वेळा संघाला विजेतेपद मिळवून दिले. तसेच त्याला भारताच्या टी20 संघाची स्थिती सुधारण्यात बीसीसीआय पाचारण करणार आहे, अशा चर्चा सुरू आहेत. MS Dhoni’s shines on the tennis court after cricket, won the doubles title in JSCA Championship
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
भारत विरुद्ध न्यूझीलंड टी20 आकडेवारी! मालिकावीर केएल राहुल, सुपर ओव्हर्समध्ये इंडियाचा विजय आणि बरेचं काही
सनरायझर्स हैदराबादने मारली आपल्याच पायावर कुऱ्हाड, ज्या दोन खेळाडूंना सोडले आणि त्यांनीच केला धमाका






