आयपीएल 2023 स्पर्धेच्या तयारीला वेग आला आहे. आयपीएलच्या सर्व संघानी लिलावाआधी आपल्या करारबद्ध आणि करारमुक्त केलेल्या खेळाडूंची यादी जमा केली आहे. त्यातच सनरायझर्स हैदराबाद संघाने जी यादी दिली त्यात केन विलियम्सन सहित 2 भारतीय खेळाडूंना करारमुक्त करण्यात आले आहे. या दोन खेळाडूंना आतापर्यंत जास्त संधी मिळाली नव्हती. त्यापैकी एका खेळाडू मागच्या हंगामाात फक्त 1 सामना खेळला असून दुसऱ्या खेळाडूचे तर अजून पदार्पण देखील केलेले नाही. मात्र, याच दोन भारतीय खेळाडूंनी विजय हजारे ट्रॉफीत आपल्या स्थानिक संघाला एकहाती विजय मिळवून दिला.
हे दोन खेळाडू आहेत रविकुमार समर्थ (Ravikumar Samarth) आणि श्रेयस गोपाल (Shreyas Gopal), ज्यांना सनरायझर्स हैदराबाद संघाने कर्णधार केन विलियम्सन (Kane Williamson) सोबत करारमुक्त केले होते. आता याच दोन खेळाडूंनी धमाकेदार प्रदर्शन करत कर्नाटक संघाला विजय मिळवून दिला. विजय हजारे ट्रॉफीच्या गट-ब मध्ये दिल्ली आणि कर्नाटक या संघामध्ये सामना खेळला गेला. या सामन्यात दिल्लीचा संघ प्रथम फलंदाजी करत 45.4 षटकातच159 धावांवर गारद झाला. 160 धावांचे हे आव्हान कर्नाटक संघाने 6 गडी गमावत पार केले. कर्नाटकच्या या विजयात कर्णधार रविकुमार समर्थ आणि फिरकीपटू श्रेयस गोपाल यांचे महत्वाचे योगदान होते. गोपालने गोलंदाजीत आणि रविकुमारने फलंदाजीत चांगले प्रदर्शन केले.
दिल्ली संघांला 159 धावांवर सर्वबाद करण्यात श्रेयस गोपाल याची भुमिका महत्वाची होती. त्याने या सामन्यात 5.4 षटकात 25 धावा देत 3 फलंदाजांना तंबूत पाठवले. त्याने त्यातील दोन खेळाडूंना त्रिफळाचित केले. जेव्हा आव्हानाचा पाठलाग करण्याची वेळ आली तेव्हा रविकुमार फलंदाजीमध्ये चमकला. कर्नाटकच्या डावाची सुरूवात करताना कठीण खेळपट्टीवर 73 चेंडूवर 59 धावांची खेळी केली. त्याचबरोबर मनिष पांडे याने देखील मधल्या फळीत चांगली खेळी करत 37 चेंडूत 48 धावा केल्या. या दोन डावांच्या मदतीने 122 चेंडू शिल्लक ठेवत सामना जिंकला.(The players released by Sunrisers Hyderabad shined in Vijay Hazare Trophy)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
त्रिपाठी-बच्छावच्या कामगिरीने महाराष्ट्राची मुंबईवर मात; यशस्वीचे शतक व्यर्थ
ऑस्ट्रेलियाने विश्वविजेत्यांना चारली धूळ, पहिल्या वनडेत इंग्लंडचा दारूण पराभव