डब्लिन। भारतीय संघाची 27 जूनपासून आयर्लंड विरुद्ध 2 सामन्यांची टी20 मालिका सुरु झाली आहे. या मालिकेत पहिल्या सामन्यात भारताने 76 धावांनी विजय मिळवत मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली.
या सामन्यात भारत गोलंदाजी करत असताना एक गमतीशीर गोष्ट घडली. 7 व्या षटकात भारताचा फिरकी गोलंदाज युजवेंद्र चहल गोलंदाजी करत होता. या षटकातील शेवटचा चेंडू फलंदाजी करत असलेल्या जेम्स शॅननच्या पॅडला लागला.
यावर भारताकडून अपीलही करण्यात आले पण मैदानावरील पंचानी त्याला नॉटआऊट दिले. पण चहलला पूर्ण आत्मविश्वास होता की शॅनन बाद आहे. म्हणून त्याने यष्टीरक्षक एमएस धोनीकडे पाहिले. त्यावेळी धोनीने त्याला सांगितले की मालिकेत डीसीजन रिव्यू सिस्टीम (डीआरएस) नाही.
त्यामुळे शॅननला जीवदान मिळाले. त्यानेच या सामन्यात आयर्लंडकडून सर्वाधिक 60 धावा केल्या.
भारताचा यष्टीरक्षक धोनीला बऱ्याचदा डीआरएसचा योग्य वापर करताना पहायला मिळाले आहे. भारतीय खेळाडू या तंत्रज्ञानाचा वापर करण्याआधी धोनीशी चर्चा करतात. यामुळे अनेकदा चाहते गमतीने डीआरएसला धोनी रिव्यू सिस्टिम असे म्हणतात.
https://twitter.com/cricketvideo18/status/1012025083072741382
महत्त्वाच्या बातम्या:
–कॅप्टन कूल धोनीच्या नावावर जगातील सर्वात कूल विक्रम!
–कोहली म्हणतो, ही आयडीया केली तर प्रतिस्पर्ध्यांच जगणं होईल मुश्किल!
–पहिल्यांदाच ब्रेट लीने केला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकरला विरोध