इंडियन प्रीमियर लीग अर्थात आयपीएलच्या चौदाव्या हंगामाला येत्या ९ एप्रिलपासून प्रारंभ होणार आहे. मागील वर्षी कोरोनामुळे ही स्पर्धा युएईमध्ये आयोजित करण्यात आली होती. मात्र यंदा पुन्हा एकदा भारतातच सहा शहरांमध्ये आयपीएलच्या या चौदाव्या हंगामाचे सामने खेळवले जातील.
या हंगामासाठी सगळ्या संघांनी आता कसून तयारी करण्यास सुरुवात केली आहे. आयपीएलमधील एक यशस्वी संघ असणाऱ्या चेन्नई सुपर किंग्जने देखील आपल्या सरावाला सुरुवात केली आहे. त्यातीलच चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीचा एक सरावा करतानाचा व्हिडिओ समोर आला आहे.
नेट्समध्ये धोनीचा कसून सराव
चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी काही दिवसांपूर्वीच चेन्नईत दाखल झाला होता. त्यांनतर त्याने आणि सहकारी खेळाडूंनी सरावाला सुरुवात केली होती. याच सरावातील एक व्हिडिओ चेन्नई सुपर किंग्जने आपल्या ऑफिशिअल ट्विटर अकाऊंटवरून शेअर केला आहे.
या व्हिडिओत धोनी नेट्समध्ये फलंदाजीचा सराव करत असल्याचे दिसून येत आहे. सीएसकेच्या पिवळ्या जर्सीत परतलेला धोनी सुरुवातीला काहीसा सावध पवित्र घेऊन फलंदाजी करताना यात दिसतोय. मात्र त्यांनतर सगळ्या गोलंदाजांना मोठे फटके मारत आक्रमक फलंदाजीची तयारी धोनी करत असल्याचेही या व्हिडिओमध्ये दिसते आहे. धोनीची ही तयारी म्हणजे प्रतिस्पर्धी संघांसाठी जणूकाही एक इशाराच आहे.
Mahi way all the way!!! 👀 on #Thala #WhistlePodu #Yellove 💛🦁 pic.twitter.com/gU1TRD2ZP9
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 11, 2021
दरम्यान, चेन्नई सुपर किंग्जचा संघ यावेळच्या आयपीएल अभियानाची सुरुवात १० एप्रिल रोजी दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध खेळवल्या जाणाऱ्या सामन्याद्वारे करेल. मागील हंगाम चेन्नईच्या संघासाठी निराशाजनक ठरला होता. संपूर्ण स्पर्धेदरम्यान सूर न गवसल्याने त्यांना बाद फेरी देखील गाठण्यात अपयश आले होते. यंदाच्या हंगामात ते प्रदर्शन विसरून आपले आयपीएलच्या इतिहासातील पाचवे जेतेपद पटकावण्याचा चेन्नईचा प्रयत्न असेल.
महत्वाच्या बातम्या:
फिटनेस टेस्टमध्ये दोनदा फेल झालेल्या मिस्ट्री स्पिनरवर भडकला विराट, म्हणाला
तो माझ्यासाठी सर्वात वाईट दिवस होता, मी अक्षरश: खोलीत एकटाच ढसाढसा रडलो
पोलार्डने नंतर माझ्याशी क्षमा मागितली आणि.., त्या विवादास्पद घटनेबद्दल श्रीलंकन फलंदाजाचा खुलासा