आयपीएलच्या 13 व्या हंगामातील 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात झाला. या सामन्यात चेन्नईचा दारुण पराभव झाला. हा चेन्नईचा या हंगामातील 8 वा पराभव होता. आम्हाला नशिबाची साथ मिळाली नाही असे सामन्यानंतर चेन्नईचा कर्णधार एमएस धोनीने सांगितले. आठ किंवा दहा विकेटने सामना गमावला याचा फरक पडत नाही पण स्पर्धेत आम्ही कोणत्या स्थानावर आहोत याचे दुःख होते असेही त्याने सांगितले.
चूक कुठे झाली ते पाहावं लागेल
सामन्यानंतर बोलताना धोनी म्हणाला की, “अशा प्रकारच्या कामगिरीमुळे दुःख होते. चूक कोठे झाली ते पहावे लागेल. हे वर्ष संघासाठी काही खास नव्हतं. आठ विकेटने किंवा दहा विकेटने सामना गमावला तरी काही फरक पडत नाही परंतु, स्पर्धेत आम्ही कोणत्या स्थानावर आहोत हे पाहून दुःख वाटते.”
नशिबाने दिली नाही साथ
पुढे बोलताना तो म्हणाला, “आम्ही कुठे चुकलो हे दुसर्या सामन्यातच तपासायला पाहिजे होतं. रायडू जखमी झाला आणि बाकीचे फलंदाज उत्कृष्ट कामगिरी करूच शकले नाही. नशिबानेही आम्हाला साथ दिली नाही. ज्या सामन्यांमध्ये आम्हाला प्रथम फलंदाजी करायची होती तेथे आम्ही नाणेफेक जिंकू शकलो नाही. आम्ही जेव्हा प्रथम फलंदाजी करत होतो तेव्हा नंतर मैदानात दव पडले होते.”
क्षमतेनुसार नाही खेळलो
संघाच्या कामगिरीबद्दल बोलताना धोनी म्हणाला, “खराब कामगिरीसाठी बरेच निमित्त दिले जाऊ शकतात. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आपण सर्वोत्कृष्ट खेळी खेळू शकतो की नाही हे स्वतःलाच विचारावे लागेल की आम्ही आतापर्यंत आमच्या क्षमतेनुसार खेळलो आहे का, नाही. आम्ही प्रयत्न केला पण यशस्वी झालो नाही.”
नवीन चेहऱ्यांना मिळेल संधी
“पुढच्या वर्षीसाठी बरेच जर आणि तर असतील. आगामी तीन सामन्यांमध्ये युवा खेळाडूंची चाचणी घेण्यात येणार आहे. डेथ ओव्हर्समध्ये कोण चांगली गोलंदाजी करू शकेल आणि दबावात कोण उत्तम फलंदाजी करू शकेल हे आंम्ही पाहू. पुढील तीन सामन्यांमध्ये नवीन चेहऱ्यांना संधी देण्यात येईल. हे आम्ही पुढल्या वर्षाच्या दृष्टिकोनातून करत आहोत.” असेही पुढे बोलताना धोनी म्हणाला.
महत्त्वाच्या बातम्या-
बटलर नंतर आता पंड्या ब्रदर्स, धोनी का वाटतोय आपली जर्सी; ‘हे’ तर कारण नाही ना?
चेन्नई पराभूत झाली पण करन-ताहिरच्या जोडीने रचला मोठा विक्रम
चेन्नईविरुद्ध एकहाती सामना जिंकवून देणारा ईशान किशन म्हणतो, ‘त्या’ खेळाडूकडून नेहमीच शिकायला मिळते
ट्रेंडिंग लेख –
‘त्याच’ नाव जरी घेतलं तरी लोकं म्हणायचे, ‘यावर्षी किती कोटी रुपये?’
“कॅप्टन! मी उद्या वर्ल्डकप फायनल खेळणार आहे”, बोट तुटलेले असतानाही ‘तो’ मैदानात उतरला
तुमच्यात इतकेच कौशल्य असेल तर पोराला क्रिकेटर बनवून दाखवा!