इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) २०२२च्या हंगामानंतर एमएस धोनी सध्या कुंटुबासोबत वेळ घालवत आहे. भारतीय संघाच्या या माजी कर्णधाराचे चाहते त्याच्यासाठी नेहमीच काही ना काही करत त्याचे लक्ष वेधून घेतात. तर धोनीही त्यांच्या कलेचे कौतुक करतो. नुकतेच त्याने चेन्नई विमानतळावर दिव्यांग मुलीशी गप्पा मारत तिच्यासोबत फोटो काढले. हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरले झाले आहेत. अशातच धोनीच्या अजून एका चाहत्याने त्याच्या कलेने सगळ्यांचे लक्ष वेधले आहेत.
क्रिकेटमध्ये फलंदाजीत आपल्या हेलिकॉप्टर शॉट्स आणि अप्रतिम यष्टीरक्षणाने चाहत्यांचे मन जिंकणाऱ्या धोनीचे (MS Dhoni) मन त्या चाहत्याने जिंकले आहे. त्या कलाकाराचे कौतुक करण्यासाठी खुद्द धोनीच तेथे पोहोचला.
या चाहत्याने धोनी आणि मुलगी झिवा यांच्या एकत्र असलेल्या फोटोचे शिवणकाम केले आहे. याचे फोटो लोकसभेच्या नेत्या दर्शना जरदोश यांनी त्याच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर पोस्ट केल्या आहेत.
एरोदे, तमिलनाडूमधील शिवणकाम करणारे अप्पूस्वामी हे हॅण्डलूमचे दुकान चालवतात. त्यांनी एका कपड्यावर धोनी आणि मुलगी झिवा यांचा एकत्र असलेल्या चित्राचे शिवणकाम केले आहे. याची चर्चा होऊ लागल्याने ती धोनीच्या कानापर्यंतही पोहोचली. त्यानंतर तो स्वत: ते चित्र पाहाण्यासाठी तेथे पोहोचला. त्याने शिवणकाम केलेल्या कपड्यासोबत फोटोही काढले आहेत.
Mr. Appusamy, a weaver from Chennimalai community, Erode, was running #OneStationOneProduct Handloom stall at Erode. An ardent cricket fan, he designed a cloth artwork with MS Dhoni and his daughter.
As the news reached Dhoni, he personally received the artpiece.@msdhoni pic.twitter.com/S9SgP0dSdU
— Darshana Jardosh (मोदी का परिवार) (@DarshanaJardosh) June 4, 2022
रांची, झारखंड येथील रहिवासी असलेला धोनी हा एकमेव कर्णधार आहे ज्याने आयसीसीचे (आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद)(ICC) तिन्ही विजेतेचषक जिंकले आहेत. २००७ टी२० विश्वचषक, २०११ वनडे विश्वचषक आणि २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी या स्पर्धांमध्ये भारताने त्याच्या नेतृत्वाखाली विजेतेपदावर आपले नाव कोरले आहेत.
धोनीच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्जने(Chennai Super Kings) आयपीएलचे (IPL) चार विजेतेपद जिंकले आहेत. तर पंधराव्या हंगामात संघाची निराशाजनक कामगिरी झाली. या हंगामात चेन्नई संघ कर्णधारपदावरून चांगलाच चर्चेत आला होता. सुरूवातीला रवींद्र जडेजाने संघाचे नेतृत्व केले. नंतर त्याला ते जमत नसल्याने त्याने पुन्हा धोनीकडे सुत्रे दिली. धोनीच्या नेतृत्वाखाली संघाने दोन सामने जिंकले. तेव्हा फार उशिर झाला होता. कारण संघाच्या प्लेऑफमध्ये आशा केव्हाच संपुष्टात आल्या होत्या.
महा स्पोर्ट्चा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मेयर्स आणि ब्रूक्सची शतके, वेस्ट इंडिजने २० धावांनी जिंकली तिसरी वनडे; मालिकाही घातली खिशात
ब्रॅडमन यांना १०० ची सरासरी ठेवण्यापासून रोखणारे एरिक हॉलिस, कारकिर्दीत मिळवले तब्बल २३२३ बळी