---Advertisement---

एमएस धोनीला ‘थाला फॉर अ रिझन’ का म्हणतात? अखेर माहीने सांगितली त्यामागची कहाणी

On: गुरूवार, ऑगस्ट 1, 2024 7:57 PM
MS Dhoni
---Advertisement---

MS Dhoni : एमएस धोनी हे भारतीय क्रिकेटमधील मोठे नाव आहे. धोनीचा चाहतावर्ग मोठा असून चाहत्यांनी त्याची अनेक टोपणनावे पाडली आहेत. धोनीला त्याचे चाहते प्रेमाने ‘माही’ आणि ‘थाला’ म्हणतात. तो बऱ्याचदा सोशल मीडियावर ‘थाला फॉर अ रिझन’ हॅशटॅगसह ट्रेंड करतो, ज्यामध्ये माहीच्या चाहत्यांची भूमिका मोठी असते. आता धोनीने स्वत: त्याच्या ‘थाला थॉर अ रिझन’ टेंड्रमागची कहाणी सांगितली.

चेन्नई सुपर किंग्ज आणि भारतीय संघाचा माजी कर्णधार धोनी एका कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आला होता, जिथे त्याला क्रिकेटशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले. दरम्यान, सोशल मीडियावर धोनीला ‘थाला फॉर अ रिझन’ म्हणून ट्रेंड करणे म्हणजे काय? असा प्रश्न विचारण्यात आला. यावर धोनीने सांगितले की, त्याला त्याच्या इंस्टाग्रामवरून याबाबत माहिती मिळाली.

धोनी म्हणाला, “मला स्वत:लाही हे माहित नव्हते. मलाही इन्स्टाग्रामवरूनच कळले. माझ्या चाहत्यांमुळे मला अभिमान वाटतो कारण मला इन्स्टाग्राम किंवा सोशल मीडियावर बोलण्याची गरज नाही. जेव्हा गरज असते तेव्हा चाहते माझा बचाव करतात. जेव्हा गरज असते तेव्हा चाहते माझे कौतुक करतात. त्यामुळे मला काहीही करण्याची गरज नाही.”

माही पुढे म्हणाला, “हा त्याचाच एक भाग आहे. मी सोशल मीडियावर तितका सक्रिय नाही. पण मी माझ्या चाहत्यांचा आभारी आहे की मी जेव्हा जेव्हा पोस्ट करतो तेव्हा त्यांना ते आवडते. हे सर्व माझ्यासाठी चाहत्यांचे प्रेम आहे आणि ‘थाला फॉर अ रिझन’ हा त्याचाच एक भाग आहे.”

आयपीएल 2025 खेळण्याबाबत शंका
दरम्यान, सर्व फ्रँचायझींची आयपीएल 2025 ची तयारी जोरात सुरू आहे. त्याचबरोबर चेन्नई सुपर किंग्जचा माजी कर्णधार धोनी आगामी हंगामात खेळणार की नाही? याबाबत चाहत्यांच्या मनात शंका आहे. याच कार्यक्रमात आयपीएल खेळण्याच्या प्रश्नावर धोनीम्हणाला की, ‘मी सध्या काही बोलू शकत नाही. सध्या संघाच्या हिताचा निर्णय घेतला जाईल.’

महत्त्वाच्या बातम्या-

खाशाबा जाधव यांना मरणोत्तर पद्मश्री मिळवून देण्यासाठी खासदार मोहोळ मैदानात
सर्वोत्तम कर्णधार कोण रोहित की धोनी? भारताच्या दिग्गज खेळाडूचं खळबळजनक वक्तव्य
कोल्हापूरकर स्वप्नील कुसाळेसाठी सतेज पाटलांनी पेटारा उघडला, जाहीर केलं मोठं बक्षीस

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---