---Advertisement---

बियरपासून चार हात दूर राहणाऱ्या धोनीच्या नावाने सुरू झाला ‘नवा ब्रँड’, जाहिरातीचा व्हिडिओही आलाय पुढे

On: शनिवार, ऑगस्ट 21, 2021 8:18 AM
MS Dhoni
---Advertisement---

भारताचे माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी याने गेल्यावर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला होता. पण त्यानंतर देखील धोनीचे चाहते कमी झाले नाहीत. आता ते माहीला आयपीएलमध्ये खेळताना पाहण्याची वाट पाहत असतात. क्रिकेटला अलविदा म्हटल्यानंतर धोनीकडे बराच वेळ आहे आणि तो हा वेळ आपल्या कुटुंबाला देतो किंवा त्याच्या व्यवसायासाठी देतो. त्यामुळे निवृत्तीनंतर देखील त्याची संपत्ती कमी झालेली नाही.

अलीकडेच धोनी फराह खानसोबत एका जाहिरातीच्या शूटवर दिसला होता. दोघांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. पुन्हा एकदा धोनी एका जाहिरातीमुळे चर्चेत आला आहे.

धोनी बिअरच्या जाहिरातीत दिसणार आहे
दरम्यान, धोनी आता बिअरच्या जाहिरातीत दिसणार आहे. तो ‘कॉप्टर ७ बिअर’ या कंपनीच्या जाहिरातीत दिसणार आहे. सेव्हन इंक ब्रूज प्रायव्हेट लिमिटेडने कॉप्टर ७ बिअर नावाची कंपनी स्थापन केली आहे आणि त्यांनी धोनीसोबत काम करण्याची घोषणा केली आहे.

बिअरचे नाव धोनीच्या नावावर असेल
सेव्हन इंक ब्रूज प्रायव्हेट लिमिटेडने एक बिअर कंपनी स्थापन केली आहे. ज्याचे नाव कॉप्टर ७ बिअर आहे आणि हे नाव धोनीमुळे ठेवण्यात आले आहे. धोनीचा ट्रेडमार्क हेलिकॉप्टर शॉट आणि जर्सी क्रमांक ७ जोडून या बिअरला कॉप्टर ७ असे नाव देण्यात आले आहे.

https://www.instagram.com/p/CSMbSJdJJAE/?utm_source=ig_web_button_share_sheet

धोनी यापूर्वीही फराह खानसोबत दिसला होता
काही काळापूर्वी धोनीचे काही फोटो सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल झाले. त्या फोटोत तो भारतीय संघाच्या रेट्रो जर्सीमध्ये दिसत होता. एवढेच नाही तर, बॉलिवूडची प्रसिद्ध क्रिकेट कोरियोग्राफर फराह खान या फोटोंमध्ये धोनीसोबत होती. धोनी फराह खानसोबत एका जाहिरातीचे शूटिंग करत होता. या शुटींगसाठी त्याने भारतीय संघाची जुनी जर्सी परिधान केली होती.

महत्वाच्या बातम्या –
आयपीएलमधील संघांना बसणार मोठा धक्का! कमिन्ससह ‘हे’ चार ऑसी खेळाडू दुसऱ्या टप्प्याला मुकणार
‘असली पिक्चर बाकी है’, उर्वरित आयपीएल २०२१ पूर्वी आलेला धोनीचा व्हिडिओ तुुफान व्हायरल
त्यावेळी सिराज हॉटेल रूममध्ये एकटा रडत बसला होता, परंतु मैदानात त्याने कधीच हार मानली नाही

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---