---Advertisement---

एमएस धोनीच्या चाहत्यांसाठी ही आहे सर्वात वाईट बातमी…

On: सोमवार, सप्टेंबर 23, 2019 5:14 PM
---Advertisement---

भारताचा अनुभवी यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनी नोव्हेंबर पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळणार नाही. तो शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना 2019 विश्वचषकातील उपांत्य फेरीत जूलैमध्ये न्यूझीलंड विरुद्ध खेळला होता.

2019 विश्वचषकानंतर तो ऑगस्टमध्ये भारतीय संघाने केलेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यासाठी तसेच नुकतेच दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मायदेशात झालेल्या टी20 मालिकेसाठी अनुपलब्ध होता.

आता मुंबई मिररने दिलेल्या वृत्तानुसार धोनी त्याच्या विश्रांतीच्या कालावधीत आणखी वाढ करणार आहे. त्यामुळे तो 24 सप्टेंबरपासून सुरु होणाऱ्या विजय हजारे ट्रॉफी तसेच नोव्हेंबरमध्ये बांगलादेश विरुद्ध मायदेशात होणाऱ्या टी20 मालिकेसाठीही अनुपलब्ध राहणार असण्याची शक्यता आहे.

तसेच यामुळे धोनी आता थेट डिसेंबरमध्ये मायदेशात वेस्ट इंडिज विरुद्ध होणाऱ्या टी20 आणि वनडे मालिकेत दिसू शकतो.

भारताकडून मागील दोन महिन्यात मर्यादीत षटकांच्या क्रिकेटमध्ये धोनीच्या अनुपस्थितीत रिषभ पंतने यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळली आहे.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

रिषभ पंत-श्रेयस अय्यरमध्ये घडलेल्या या गोंधळामागील विराट कोहलीने स्पष्ट केले कारण

मैदानावर पाऊल ठेवताच हिटमॅन रोहित शर्माने केली धोनीच्या या मोठ्या विक्रमाची बरोबरी

विराट, रोहितचा समावेश असणाऱ्या या खास यादीत शिखर धवनही झाला समील

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment