महेंद्र सिंग धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने इंडियन प्रीमिअर लीग 2023 हंगामाची ट्रॉफी उंचावली. ही ट्रॉफी जिंकताच आधीपासूनच आयपीएलमधील सर्वात यशस्वी संघांपैकी एक असलेल्या सीएसकेने मुंबई इंडियन्स संघाची बरोबरी केली. मुंबई आणि चेन्नई संघांच्या नावावर प्रत्येकी 5 किताब आहेत.
एक वेळ अशी होती, जेव्हा चेन्नई सुपर किंग्स (Chennai Super Kings) संघात एमएस धोनी (MS Dhoni) आणि सुरेश रैना (Suresh Raina) यांचा बोलबाला होता. मात्र, आयपीएल 2021 (IPL 2021) हंगामानंतर रैनाला सीएसकेतून बाहेरचा रस्ता दाखवला. मात्र, चेन्नईची साथ सुटल्यानंतरही धोनी आणि रैनाच्या नात्यात कोणतेही अंतर आले नाही. त्यामुळेच क्रिकेट तज्ञ म्हणून जेव्हाही रैनाला संधी मिळते, तेव्हा तो धोनीची प्रशंसा करताना मागे-पुढे पाहत नाही. नुकतेच, त्याने धोनीबाबत मोठा खुलासा केला, ज्यामुळे तो चर्चेत आहे.
आयपीएल 2021 हा रैनाचा शेवटचा हंगाम ठरला होता. त्या हंगामात त्याने फक्त 12 सामने खेळले होते. त्यानंतर त्याला संधी मिळाली नव्हती. रैनाच्या जागी रॉबिन उथप्पा (Robin Uthappa) याला प्लेइंग इलेव्हनचा भाग बनवले गेले होते. त्यामुळे चाहतेही खूपच नाराज झाले होते. याबाबत रैनाने आता खुलासा केला आहे.
जिओ सिनेमाशी बोलताना रैनाने सांगितले की, धोनीने उथप्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये सामील करण्यापूर्वी त्याची परवानगी घेतली होती. तो म्हणाला की, “एमएस धोनीने माझ्या जागी उथप्पाला प्लेइंग इलेव्हनमध्ये घेण्यापूर्वी माझी परवानगी घेतली होती. मी त्याला उथप्पाला खेळण्यास सांगितले. कारण, त्यांनी 2021मध्ये त्याला संधी न मिळूनही त्याने संपूर्ण हंगामात चांगली मेहनत केली होती.” रैना पुढे म्हणाला की, “जेव्हा धोनी आणि मी बोललो, तेव्हा मी त्याला सल्ला दिला की, तुम्ही रॉबिन उथप्पाला खेळवले पाहिजे. यावर धोनीने मला परवानगी घेतली आणि मी म्हणालो की, तो तुम्हाला अंतिम सामना जिंकून देईल, माझ्यावर विश्वास ठेवा.”
खुलासा करत रैना असेही म्हणाला की, “एमएस धोनीने म्हणाला की, ‘हे पाहा आपण दोघेही 2008पासून सोबत खेळत आहोत, पण मला हा हंगाम जिंकायचा आहे. आता, तूच मला सांग की, काय केले पाहिजे.’ यावर मी म्हणालो की, रॉबिनला तिसऱ्या क्रमांकावर खेळवा आणि खात्री करा की, तो अंतिम सामन्यापर्यंत प्लेइंग इलेव्हनचा भाग राहील. जर तुम्ही जिंकला, तर सीएसके जिंकेल. मी खेळो किंवा तो, रॉबिन आणि रैना एकच आहे.”
रैनाची आयपीएल कारकीर्द
रैनाच्या आयपीएल कारकीर्दीविषयी बोलायचं झालं, तर त्याने आयपीएलमध्ये खेळताना एकूण 205 सामने खेळताना 32.52च्या सरासरीने 5528 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 1 शतक आणि 39 अर्धशतके झळकावली आहेत. रैनाला ‘मिस्टर आयपीएल’ म्हणूनही ओळखले जाते. (ms dhoni took my permission suresh raina reveals reason behind getting dropped from csk in ipl 2021 read)
महत्वाच्या बातम्या-
शतक एक, विक्रम अनेक! रूटने सेंच्युरी ठोकताच मोडला डॉन ब्रॅडमन यांचा मोठा Record, एकदा वाचाच
अफलातून! बाऊंड्री लाईनवर झेप घेत पठ्ठ्याने एका हाताने पकडला झेल, असा Catch तुम्ही कधीच पाहिला नसेल