रविवारी (दि. 30 एप्रिल) आयपीएल 2023चा 41 वा सामना चेन्नई सुपर किंग्स वि. पंजाब किंग्स संघात खेळला गेला. चेन्नई येथील चेपॉक स्टेडियमवर झालेल्या सामन्यात चेन्नईने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर ऋतुराज गायकवाड, डेवॉन कॉनवे व शिवम दुबे यांनी केलेल्या शानदार खेळीमुळे चेन्नईने 200 धावांचा टप्पा गाठला. मात्र, चेन्नईचा कर्णधार एमएस धोनी याने अखेरच्या दोन चेंडूंवर दोन षटकार ठोकत वाहवा मिळवली.
नाणेफेक जिंकून धोनीने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला होता. ऋतुराज गायकवाड व डेवॉन कॉनवे या स्पर्धेतील सर्वात यशस्वी सलामी जोडीने पुन्हा एकदा तशीच भागीदारी केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी 9.4 षटकात 86 धावा केल्या. ऋतुराजने 37 धावा केल्या. तिसऱ्या क्रमांकावरील शिवम दुबे याने देखील आक्रमक 28 धावा केल्या. कॉनवेने अखेरपर्यंत नाबाद राहत आपल्या आयपीएल कारकिर्दीतील सर्वोत्तम 92 धावांची खेळी केली.
Last over of the innings.@msdhoni on strike 💛, you know the rest 😎💥#TATAIPL | #CSKvPBKS pic.twitter.com/xedD3LggIp
— IndianPremierLeague (@IPL) April 30, 2023
असे असताना एमएस धोनी याने अखेरच्या षटकात फलंदाजीला येत सर्व चर्चा आपल्या बाजूने केली. पहिल्या चेंडूवर जडेजा बाद झाल्यानंतर तो मैदानात उतरला. त्याला आपल्या पहिल्या चेंडूवर एकही धाव घेता आली नाही. त्यानंतर त्याने एक धाव काढली. पुढील चेंडूवर कॉनवेने एक धाव काढत पुन्हा धोनीला स्ट्राइकवर आणले. त्यावेळी चेपॉक स्टेडियमवर हजर असलेल्या सर्व प्रेक्षकांना खुश करत त्याने दोन खणखणीत षटकार ठोकले.
सॅम करनने टाकलेल्या पाचव्या चेंडूवर त्याने पॉईंटच्या डोक्यावरून षटकार खेचला. तर, अखेरचा चेंडू फुलटॉस मिळाल्यानंतर त्याने लॉंग ऑनच्या दिशेने षटकार मारत संघाच्या 200 धावा केल्या. धोनीने आत्तापर्यंत या आयपीएलमध्ये अखेरच्या षटकात 7 षटकार खेचण्याची कामगिरी केली असून, त्याच्या जवळपासही कोणता फलंदाज नाही.
(MS Dhoni Two Big Sixes On Last Two Balls In CSKvPBKS Match)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
मुंबईच्या ताफ्यात इंग्लंडच्या घातक वेगवान गोलंदाजाची एन्ट्री, बदली खेळाडू म्हणून मिळाली संधी
“आता अक्षरला दिल्लीचा कर्णधार बनवा”, भारतीय दिग्गजाची वॉर्नरच्या नेतृत्वावर नाराजी