क्रिकेटविश्वातील मोठ-मोठ्या नावांमध्ये बऱ्याचदा तुलना होत असते. चाहते अनेकदा एकाच संघातील खेळाडूंची तुलना करताना दिसतात. त्याचप्रमाणे चाहते अनेकदा भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी आणि सध्याचा फलंदाज विराट कोहली यांच्यात तुलना करताना नेहमी दिसतात. आता माजी अनुभवी वेगवान गोलंदाज डॅनी मॉरिसनने या दोघांच्या तुलनेबाबत न्यूझीलंडला धक्कादायक उत्तर दिले आहे.
कोहली आणि धोनी या दोन्ही फलंदाजांनी जागतिक क्रिकेटमध्ये आपले नाव कोरले आहे. धोनी हा त्याच्या उत्कृष्ट कर्णधारपदासाठी, यष्टिरक्षणासाठी आणि सामने पूर्ण करण्यासाठी ओळखला जात होता. तर कोहलीला आक्रमक फलंदाज म्हणून पाहिले जाते. डॅनी मॉरिसनने ‘इनसाइडस्पोर्ट्स’शी बोलताना कोहली आणि धोनीच्या तुलनेवर प्रतिक्रिया दिली.
जास्त विचार न करता मॉरिसनने धोनी आणि कोहली यांच्यामध्ये एमएस धोनीचे नाव घेतले. त्याने त्याच्या अष्टपैलू कामगिरीसाठी धोनीची निवड केली. ज्यात कर्णधारपद, यष्टिरक्षण आणि सामने पूर्ण करण्याची क्षमता समाविष्ट आहे. धोनीसारखे मेगा पॅकेज मिळणे कठीण असल्याचे त्याने सांगितले.
पुढे बोलताना मॉरिसन म्हणाला, “अशी कोणती मोठी गोष्ट नाही, ती एमएसडी (धोनी) न करु शकेल. जेव्हा कर्णधार, प्रेरणा, फिनिशर, कीपिंग या सर्व गोष्टी तुमच्या झटपट हाताने चांगल्या होतात. तेव्हा एमएस धोनीला हरवणे कठीण असते.”
एमएस धोनीने 2020 मध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली होती. त्यानंतर तो सलग आयपीएल खेळत आहे. ज्या धोनीसाठी तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ओळखला जात होता. त्याचीच झलक आयपीएलमध्ये अनेकदा पाहायला मिळते. माही अजूनही विकेटकीपिंग करतो. तर दुसरीकडे विराट कोहली सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये धुमाकूळ घालत आहे. कोहली सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय धावा करणारा सक्रिय खेळाडू आहे.
हेही वाचा-
इंग्लंडचा ऑस्ट्रेलियाला धोबीपछाड, वनडे सामन्यात कांगारुंचा चौथा सर्वात मोठा पराभव
IND vs BAN: रोहित शर्माच्या निर्णयाने इतिहास बदलला, 60 वर्षांचा सिलसिला तुटला
24.75 कोटींचा ताप उतरला, पंजाबच्या फलंदाजाने स्टार्कला धो धो धुतले, कांगारू गोलंदाजाचा लाजिरवाणा विक्रम