इंडियन प्रीमियर लीगच्या तेराव्या हंगामाचा प्रवास पूर्ण करुन काही दिवसांपूर्वी एमएस धोनी त्याच्या घरी म्हणजेच रांचीला परतला. आता हाच धोनी रांचीच्या रस्त्यावर त्याच्या सर्वात आवडत्या गोष्टीचा आनंद लुटताना दिसत आहे. यावर्षी धोनीच्या नेतृत्त्वाखालील चेन्नई सुपर किंग्स संघ जास्त चांगले प्रदर्शन करु शकला नाही. त्यामुळे प्लेऑफच्या शर्यातीतून ते लवकरच बाहेर झाले. त्यानंतर साखळी फेरीतील आपले सर्व सामने पूर्ण करुन चेन्नईचे खेळाडू आपापल्या देशासाठी रवाना झाले होते.
निवृत्तीनंतर पहिल्यांदाच दिसला बाईक चालवताना
आपणा सर्वांना माहिती आहे की, धोनीला बाईक्स आणि कार्सची खूप आवड आहे. त्याच्याकडे एकाहून एक जबरदस्त आणि महागड्या बाईक्स आहेत. आता आयपीएल २०२०मधून आपला संघ बाहेर पडल्यानंतर रांचीला आलेला धोनी त्याच्या आवडत्या गोष्टींना प्राधान्य देत आहे. तो सोमवारी (९ नोव्हेंबर) आपली जुनी यमाहा बाईक घेऊन रांचीच्या रिंग रोडवर फेरफटका मारताना दिसला.
महत्त्वाचे म्हणजे, १५ ऑगस्ट रोजी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती झाल्यानंतर धोनीला बाईक चालवताना पाहण्याची ही पहिलीच वेळ आहे. कारण त्याने युएईला जाण्याच्या काही दिवसांआधीच निवृत्तीची घोषणा केली होती. त्यानंतर तो पूर्ण वेळ युएईत आयपीएल खेळण्यात व्यस्त होता.
धोनीची आयपीएल २०२०मधील कामगिरी
आयपीएल २०२०मध्ये धोनी त्याच्या लौकिसास साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरला. त्याने या हंगामात एकूण १४ सामने खेळले असून केवळ २०० धावा केल्या आहेत. दरम्यान त्याला एकही अर्धशतक लगावता आले नाही, तर त्याच्या चौकारांची संख्या १६ आणि षटकारांची ७ इतकी आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
फायनलमध्ये सलामीला फलंदाजी करणार का नाही?, पाहा काय म्हणाला मार्कस स्टॉयनिस
आयपीएल २०२०ची अंतिम लढाई लढण्यापूर्वी सचिन तेंडुलकरचा मुंबईला खास संदेश, म्हणाला…
अजिंक्य रहाणे तुझ्यासोबत कसा?, रवींद्र जडेजाने शेअर केलेला फोटो पाहून गोंधळला शिखर धवन
ट्रेंडिंग लेख-
लईच वाईट! आयपीएलमध्ये कर्णधार म्हणून ‘फ्लॉप’ ठरलेले ३ भारतीय खेळाडू
RCB च्या कर्णधारपदी कुणाची लागू शकते वर्णी? ही ३ नावे चर्चेत
मुंबई इंडियन्सचे ४ दमदार खेळाडू; ज्यांना कधीही करू नये रिलीझ