सोमवारी (२२ नोव्हेंबर) सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचा अंतिम सामना पार पडला. या सामन्यात कर्नाटक आणि तामिळनाडू हे दोन्ही संघ आमने सामने होते. एकवेळ असे वाटू लागले होते की, तामिळनाडू संघ हा सामना गमावणार. परंतु, शेवटच्या चेंडूवर ५ धावांची आवश्यकता असताना शाहरुख खानने खणखणीत षटकार मारत धोनी स्टाईलमध्ये सामना तमिळनाडू जिंकून दिला. त्याचबरोबर संघाला विजेतेपदही मिळवून दिले. मुख्यबाब म्हणजे धोनी देखील हा सामना लाईव्ह पाहत होता. ज्याचा फोटो सध्या आता सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.
एमएस धोनीने आपल्या कारकीर्दीत अनेकदा षटकार मारून आपल्या संघाला विजय मिळवून दिला आहे. शाहरुख खानने ही असेच काहीसे करत तामिळनाडू संघाला सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी २०२१ स्पर्धेचे जेतेपद मिळवून दिले. सर्वात आठवणीतला क्षण म्हणजे एमएस धोनी देखील हा सामना लाईव्ह पाहत होता. ज्याचा फोटो चेन्नई सुपर किंग्ज आपल्या अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करताच, चाहत्यांनी अंदाजाचे पुल बांधायला सुरुवात केली आहे की, शाहरुख खान येणाऱ्या आयपीएल २०२२ स्पर्धेत चेन्नई सुपर किंग्ज संघाचे प्रतिनिधित्व करताना दिसून येऊ शकतो.
शाहरुख खानने देशांतर्गत क्रिकेट स्पर्धांमध्ये अप्रतिम कामगिरी केली आहे. याच कामगिरीची दखल घेत आयपीएल २०२१ स्पर्धेसाठी झालेल्या लिलावात त्याला ५.२५ कोटी रुपये खर्च करत पंजाब किंग्ज संघात स्थान देण्यात आले होते. परंतु, या स्पर्धेत त्याला हवी तशी कामगिरी करता आली नव्हती. त्याने आयपीएल २०२१ स्पर्धेतील ११ सामन्यात २१.८५ च्या सरासरीने १५३ धावा केल्या होत्या.
Fini 𝙎𝙚𝙚 ing off in sty7e! 💛#SyedMushtaqAliTrophy #WhistlePodu 🦁 pic.twitter.com/QeuLPrJ9Mh
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) November 22, 2021
या सामन्यात तामिळनाडू संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. कर्नाटक संघाकडून प्रथम फलंदाजी करताना अभिनव मनोहरने सर्वाधिक ४६ धावांची खेळी केली, तर प्रवीण दुबेने ३३ धावांचे योगदान दिले. या खेळीच्या जोरावर कर्नाटक संघाला ७ बाद १५१ धावा करण्यात यश आले होते.
या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या तामिळनाडू संघाकडून नवनीत जगदिशनने सर्वाधिक ४१ धावांची खेळी केली, तर शाहरुख खानने ३३ धावांचे योगदान देत तामिळनाडू संघाला सामना जिंकून दिला.
महत्त्वाच्या बातम्या –
असं कोण बाद होतं? दोन वेळा चेंडू अडवण्याचा केला प्रयत्न, तरी फलंदाज झाला हिटविकेट; पाहा व्हिडिओ
अवघ्या ७ मिनीटात गॅरी कर्स्टन झाले होते टीम इंडियाचे कोच, पाहा कसे
जेव्हा गॅरी कर्स्टनसाठी धोनीने रद्द केली होती टीम इंडियाची ट्रीप