भारतीय संघाची माजी कर्णधार महेंद्र सिंग धोनीने आपल्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवले होते. त्याचबरोबर त्याच्या नेतृत्वाखाली चेन्नई सुपर किंग्ज संघाने आयपीएलमध्ये तीनवेळा विजेतेपद मिळविले आहे. चेन्नई सुपर किंग्ज संघ हा संघ आयपीएल इतिहासातील सर्वात यशस्वी संघ आहे. मात्र आता महेंद्र सिंग धोनी बद्दल भारतीय संघाचा माजी डावखुरा फलंदाज गौतम गंभीरने एक प्रतिक्रिया दिली आहे. गौतम गंभीर म्हणाला धोनी फक्त यंदाच्या आयपीएल स्पर्धेत संघ बांधणीवर लक्ष देईल.
स्टार स्पोर्ट्सच्या क्रिकेट कनेक्टेड या कार्यक्रमात गौतम गंभीरला प्रश्न विचारला की, चेन्नई सुपर किंग्ज संघ लिलावापूर्वी बर्याच खेळाडूला करारातून मुक्त करेल का? या प्रश्नावर उत्तर देताना गौतम गंभीर म्हणाला, “जर तुम्ही बर्याच खेळाडूंना करारातून मुक्त केले, तर मग बघावे लागेल की लिलावासाठी काय-काय शिल्लक राहील. मी या गोष्टीशी पूर्णपणे सहमत आहे की, आपण मागील 2-3 वर्षापासून चर्चा करत आहोत की, चेन्नई सुपर किंग्ज संघात जास्त प्रमाणात वयस्कर खेळाडू आहेत. परंतु त्यांनी ज्या प्रकारे कामगिरी केली आहे. मी बर्याच वर्षापासून म्हणत आहे की, महेंद्र सिंग धोनीची ही विशेषता आहे. लोक म्हणतात धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघाला कसे आयपीएल स्पर्धेत येवढे यशस्वी बनवले आणि याचे कारण हे की, तो फक्त त्याच वर्षावर लक्ष देतो.”
“धोनी याच आयपीएल हंगामावर लक्ष देईल”
गौतम गंभीर पुढे म्हणाला, “महेंद्र सिंग धोनी पुढील 2-3 वर्षासाठी संघबांधणी बद्द्ल विचार करणार नाही उलट तो फक्त याच वर्षावर लक्ष देईल. त्याची गुणवत्ता या हंगामासाठी तशीच राहणार आहे. जो संघ आणि खेळाडू त्याला या वर्षी चषक जिंकून देतील त्यावरच तो लक्ष देईल.”
महेंद्र सिंग धोनीने चेन्नई सुपर किंग्ज संघासाठी आतापर्यंत 204 सामने खेळले आहेत. त्यापैकी त्याने 182 डावात 40.99 च्या सरासरीने 4632 धावा केल्या आहेत. यामध्ये त्याची सर्वोच्च धावसंख्या 84 आहे. तसेच तो 69 वेळा नाबाद राहिला आहे. त्याने 313 षटकार आणि 216 चौकार ठोकले आहेत. त्याचबरोबर त्याने 23 अर्धशतके झळकावली आहेत.
महत्वाच्या बातम्या:
रिषभ पंतने ४ महिन्यात १० किलो वजन केले कमी; प्रशिक्षकांनी केला उलगडा
त्या ऐतिहासिक कसोटीची ९० वर्षं; एकही अर्धशतक न लगावता अवघ्या दीड दिवसात संपला होता सामना
म्हणून मोहम्मद आमिरला वगळले होते, प्रशिक्षक मिसबाह-उल-हकने केला खुलासा