भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनी (ms dhoni) आणि अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने (yuvraj singh) भारतीय संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. ही जोडी जेव्हा ही मैदानात उतरायची त्यावेळी विरोधी संघातील गोलंदाजांना घाम फुटायचा. धोनीने फिनिशर म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. या दोघांनीही आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम केला आहे. त्यामुळे खूप कमी वेळेस हे दोघे एकत्र दिसून येतात. दरम्यान हे दोघेही एकत्र असल्याचे छायाचित्र सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.(yuvraj singh ms dhoni viral photo)
व्हायरल होत असलेल्या छायाचित्रामध्ये धोनी आणि युवराज सिंग सोफ्यावर बसून संवाद साधताना दिसून येत आहेत. हे व्हायरल छायाचित्र मुंबईतील असल्याचे म्हटले जात आहे. दोघेही जाहिरातीचे शूटिंग करण्यासाठी एकत्र आले होते. हे छायाचित्र युवराज सिंगने आपल्या इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहे.
भारतीय संघाने धोनीच्या नेतृत्वाखाली २००७ टी२० विश्वचषक आणि २०११ विश्वचषक स्पर्धेत विजय मिळवला होता. या दोन्ही स्पर्धेत युवराज सिंगचा बोलबाला होता. २००७ टी२० विश्वचषक स्पर्धेत युवराज सिंगने इंग्लंड संघाविरुद्ध अवघ्या १४ चेंडूंमध्ये ५८ धावांची खेळी केली होती. तर, उपांत्य फेरीच्या सामन्यात त्याने ऑस्ट्रेलिया संघाविरुद्ध ३० चेंडूंमध्ये ७० धावांची खेळी केली होती. तर २०११ विश्वचषक स्पर्धेत तो ‘ प्लेअर ऑफ द टुर्नामेंट’चा मानकरी ठरला होता.
Yuvraj Singh's latest Instagram story:#Yuvi #MSD pic.twitter.com/FdCWaR2tkF
— StumpMic Cricket (@stumpmic_) December 6, 2021
युवराजने धोनीच्या नेतृत्वाखाली एकूण १०४ सामने खेळले. ज्यामध्ये त्याला ३०७७ धावा करण्यात यश आले होते. यादरम्यान त्याने ६ शतक आणि २१ अर्धशतक झळकावले होते. तसेच त्याच्या कारकिर्दीबद्दल बोलायचं झालं तर, त्याने आपल्या कारकीर्दीत ३०४ वनडे सामने खेळले. ज्यामध्ये त्याला ८७०१ धावा करण्यात यश आले होते. तर १११ गडी देखील बाद केले होते. तर ५८ टी२० सामन्यात त्याने ११७७ धावा आणि २८ गडी बाद केले आहेत. तर कसोटी कारकिर्दीत त्याला अवघे ४० कसोटी सामने खेळण्याची संधी मिळाली. यादरम्यान त्याने १९०० धावा केल्या. यासह ९ गडी देखील बाद केले.
महत्वाच्या बातम्या –
फक्त एजाज-रचिनच नव्हे, तर ‘या’ ४ भारतीय वंशाच्या क्रिकेटर्सने टीम इंडियाला टाकले आहे अडचणीत