आयपीएल कर्णधार म्हणून एमएस धोनी याची कामगिरी जबरदस्त राहिली आहे. धोनीने आपल्या नेतृत्वातील 58.37 टक्के सामने जिंकले आहेत. त्याच्या नेतृत्वात चेन्नई सुपर किंग्जने आयपीएल 2010, 2011, 2018 आणि 2021 हंगामांमध्ये विजेतेपदं पटकावली आहेत. धोनीच्या नेतृत्वात सीएसकेने आतापर्यंत 129 सामने जिंकले आहेत.
कर्णधार म्हणून एमएस धोनीनंतर सर्वाधिक आयपीएल सामने जिंकण्याचा विक्रम रोहित शर्मा (Rohit Sharma) याच्या नावावर आहे. रोहितने आतापर्यंत 152 सामन्यांपैकी 83 सामन्यांमध्ये संघाला विजय मिळवून दिला आहे. आयपीएलमध्ये एमएस धोनी (MS Dhoni) एकूण दोन सांघांचा कर्णधार राहिला आहे. चेन्नई सुपर किंग्ज आणि रायजिंग पुणे सुपर जायंट्स संघाचे कर्णधारपद धोनीकडे राहिले होते.
यष्टीरक्षकाच्या भूमिकेत एमएस धोनी याने अप्रतिम कामगिरी केली आहे. यष्टीपाठी आपली भूमिका पार पाडताना धोनीने आतापर्यंत अनेक विक्रम नावावर केले आहेत. आयपीएलमधील सर्वात यशस्वी यष्टीरक्षक देखील धोनीच आहे. धोनीने यष्टीरक्षक म्हणून 235 डावांमध्ये 117 फलंदाजांना बाद केले आहे. धोनीने 137 झेल पकडले आहेत, तर 40 स्टंपिंग्ज केल्या आहेत. धोनीनंतर दुसरा क्रमांक दिनेश कार्तिक याचा आहे. कार्तिकने यष्टीरक्षक म्हणून 166 फलंदाजांना बाद केले आहे.
धोनी रिव्यू सिस्टिम
क्रिकेटच्या मैदानात डीआरएसचा अर्थ डिसिजन रिव्यू सिस्टिम असतो. पण धोनी मैदानात असल्यानंतर चाहते याला धोनी रिव्यू सिस्टिम असेही म्हणतात. डीआरएस घेताना अनेक कर्णधार गोलंदाज आणि यष्टीरक्षकाचे मत विचारात घेतात. पण यष्टीपाठी उभा असलेल्या धोनीने एकदा डीआरएस घेतला, तर तो बरोबरच असणार असा विश्वास खेळाडूंसह प्रत्येकाला असतो. धोनीने आयपीएमध्ये घेतलेल्या एकूण डीआरएसपैकी 85.71 टक्के डीआरएस बरोबर ठरले आहेत.
फलंदाजी क्रमातील विविधता
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये खेळणाऱ्या फलंदाजांचे स्थान बहुतांश वेळा निश्चित असते. पण धोनीच्या बाबतीत ही बाब चुकीची ठरते. धोनीने आयपीएलमध्ये 3 ते 7 या दरम्यान कोणत्याही क्रमांकावर तो खेळू शकतो, हे दाखवून दिले आहे. विशेष म्हणजे यातल्या प्रत्येक क्रमांकावर खेळताना धोनीने अर्धशतक केले आहे. अशी कामगिरी करणारा धोनी एकमेव फलंदाज आहे. (MS Dhoni’s big records in IPL)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सुपरफ्लॉप ठरत असलेल्या रोहितविषयी सेहवागची बेधडक प्रतिक्रिया; म्हणाला, ‘तो गोलंदाजांमुळे नाही, तर…’
बिझनेस माईंड अंबानींचा ‘घाटे का सौदा’ ठरला आर्चर! दोन वर्षात संघाचे झाले नुकसानच