---Advertisement---

एमएस धोनी मतदानासाठी रांचीत, लेक झिवाने मतदान करण्याचे नागरिकांना केले आवाहन, पहा व्हिडिओ

On: सोमवार, मे 6, 2019 6:43 PM
---Advertisement---

2019 लोकसभा निवडणूकांचे 5 व्या टप्प्यातील मतदान आज(6 मे) भारतातील 7 राज्यात 51 जागांसाठी होत आहे. यात रांची मतदार संघाचाही समावेश आहे. त्यामुळे भारतीय संघाचा यष्टीरक्षक फलंदाज एमएस धोनीने आज रांचीमध्ये मतदान केले आहे.

यावेळी त्याच्याबरोबरच त्याची पत्नी साक्षी आणि त्याचे आई-वडीलही जवाहर विद्या मंदीर, रांची येथे मतदानासाठी उपस्थित होते. तसेच धोनीची 4 वर्षांची मुलगी झिवाही त्यांच्यासोबत उपस्थित होती.

धोनीने मतदानानंतर इंस्टाग्रामवर झिवाबरोबरी एक व्हि़डिओ शेअर केला आहे. यामध्ये झिवा मतदानाचा अधिकार वापरण्याचे अपील करत आहे. धोनीने या व्हिडिओला कॅप्शन देताना लिहिले आहे की ‘तूमच्या अधिकाराचा वापर करा’

तसेच या व्हिडिओत झिवा म्हणत आहे की ‘ज्याप्रमाणे माझ्या मम्मी आणि पाप्पाने केले त्याप्रमाणे जाऊन मतदान करा.’

धोनीने मतदानासाठी आयपीएलच्या व्यस्त कार्यक्रमातून वेळ काढत जागरुक नागरिक होण्याचे कर्तव्य पार पाडले आहे. त्याने चेन्नई सुपर किंग्सकडून रविवारी(5 मे) किंग्स इलेव्हन पंजाब विरुद्ध मोहालीमध्ये आयपीएल 2019च्या साखळी फेरीतील शेवटचा सामना खेळला आहे.

आता आयपीएल 2019 मध्ये प्लेऑफच्या फेरीला सुरुवात होणार असून 7 मे ला गतविजेत्या चेन्नईचा क्वालिफायर 1चा सामना मुंबई इंडियन्स विरुद्ध एमए चिदंबरम स्टेडियम, चेन्नई येथे होणार आहे. या सामन्यात विजय मिळवणारा संघ थेट अंतिम सामन्यात प्रवेश करणार आहे.

त्यामुळे उद्या होणारा हा सामना खेळण्यासाठी चेन्नई सुपर किंग्सचा कर्णधार असणारा धोनी मतदानानंतर पुन्हा चेन्नईला रवाना झाला आहे.

https://www.instagram.com/p/BxHZXhrlCH1/

महत्त्वाच्या बातम्या –

विराट कोहलीने त्याची विकेट घेणाऱ्या खलील अहमदची अशी उडवली खिल्ली, पहा व्हिडिओ

प्लेऑफआधी चेन्नईला बसला मोठा धक्का, विश्वचषकातूनही बाहेर पडू शकतो हा खेळाडू

उद्यापासून सुरु होणाऱ्या आयपीएल २०१९ प्लेऑफबद्दल सर्वकाही…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment