जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा 2021-23 ऑस्ट्रेलियाने जिंकली. रविवारी (11 जून) ऑस्ट्रेलियाला 209 धावांनी भारताला पराभूत केले आणि डब्ल्यूटीसीची गदा उंचावली. रोहित शर्मा याच्या नेतृत्वातील भारतीय संघाने विजयासाठी प्रयत्न केले. पण दोन्ही डावांमध्ये संघाचे फलंदाज अपयशी ठरल्याचे पाहायला मिळाले. डब्ल्यूटीसीच्या अंतिम सामन्यात पराभूत झाल्यानंतर चाहते रोहितसह भारतीय संघावर टीका करत आहेत. दुसरीकडे भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी देखील सोशल मीडियावर ट्रेंडला आहे.
एमएस धोनी () भारताचा सर्वात यशस्वी कर्णधार ठरला आहे. डब्ल्यूटीसी 2021-23मध्येही धोनीच्या नेतृत्वाची कमतरता भारतीय संघाला जाणवली. भारतीय संघाने यावर्षी इतिहासातील आयसीसीसाचा 11वा अंतिम सामना खेळला. यापैकी 4 अंतिम सामने भारताने धोनीच्या नेतृत्वात खेळले आणि त्यातील तीन सामने जिंकले देखील. राहिलेल्या 7 अंतिम सामन्यांमध्ये भारताचे नेतृत्व वेगवेगळ्या कर्णधारांच्या हातात होते. त्यापैकी फक्त एकच सामना भारताला जिंकता आला, जो होता 1983 साली कपिल देव यांनी जिंकवून दिलेला वनडे विश्वचषक. याचाच अर्थ असा की धोनीनंतर भारताचे नेतृत्व करणाऱ्या विराट कोहली आणि रोहित शर्मा यांना अद्याप एकही आयसीसी ट्रॉफी जिंकता आली नाहीये. डब्ल्यूटीसी 2021-23चे विजेतेपद भारताच्या अघदी हाताशी अशतानाही संघाला ही गदा उंचावता आली नाही.
आयसीसीच्या अंतिम सामन्यांमध्ये भारतीय संघ
एमएस धोनीच्या नेतृत्वात – 4 पैकी 3 विजय
इतर कर्णधारांच्या नेतृत्वात – 7 पैकी 1 विजय
दरम्यान, डब्ल्यूसीचीया या अंतिम सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर भारताने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजीला आलेल्या ऑस्ट्रेलियाने 121.3 षटकांमध्ये 469 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारताने 69.4 षटकांमध्ये 296 धावा केल्या. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियन संघ आधीच आघाडीवर असल्यामुळे त्यांना 8 बाद 270 धावांवर घोषित केला. शेवटच्या डावात विजयासाठी भारताला 444 धावांची आवश्यकता होती. मात्र, भारतीय संघ 63.3 षटकांमध्ये 234 धावांवर सर्वबाद झाला. परिणामी ऑस्ट्रेलियाने 209 धावांनी विजय मिळवला. या विजयानंतर ऑस्ट्रेलिया पहिला संघ बनला, ज्यांनी आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकल्या आहेत. (MS Dhoni’s performance in ICC finals)
महत्वाच्या बातम्या –
आयसीसी ट्रॉफींचा बादशाह फक्त ऑस्ट्रेलिया! 1-2 नाही, तर ‘एवढे’ किताब नावावर, पाहा वर्ष आणि स्पर्धांची यादी
अनुष्काने ओव्हलवर येऊन केली चूक! विराटची विकेट पडताच अभिनेत्री जोरात ट्रोल