---Advertisement---

गुणतक्त्यात अव्वल स्थानी पोहचलेल्यानंतर सीएसकेचा कर्णधार धोनी म्हणतोय, आम्ही…

On: सोमवार, सप्टेंबर 27, 2021 10:27 AM
MS-Dhoni
---Advertisement---

रविवारी (२६ सप्टेंबर) चेन्नई सुपर किंग्ज आणि कोलकाता नाइट रायडर्स यांच्यात आयपीएल २०२१ चा ३८ वा सामना खेळवला गेला. अंत्यंत चुरशीच्या झालेल्या या सामन्यात चेन्नईने अखेरच्या चेंडूवर विजयी धोव घेत विजय मिळवला. या विजयानंतर चेन्नईचे आयपीएलच्या प्ले-ऑफमधील स्थन पक्के होताना दिसत आहे. रवींद्र जडेजाने महत्वाच्या वेळी आक्रमत फलंदाजी करत संघाच्या विजयात मोठे योगदान दिले. चेन्नईने विजय मिळविल्यानंतर संघाचा कर्णधार एमएस धोनीने समाधान व्यक्त केले आहे.

सामन्यात मिळालेल्या विजयानंतर धोनी म्हणाला, “हा अप्रतिम विजय राहिला. कधी तुम्ही चांगले क्रिकेट खेळता आणि पराभूत होता.  पंरतू तेव्हा मजा येते, जेव्हा तुम्हा चांगले खेळत नाही तरीही विजय मिळतो. दोन्ही संघांनी चांगले क्रिकेट खेळले आणि प्रेक्षकांनीही त्याच्या आनंद घेतला. आम्ही छोटे स्पेल टाकत चांगली गोलंदाजी केली. वेगवान गोलंदाजांसाठी हे सोपे नव्हते. आम्ही त्यांना लहान स्पेल देण्याचा प्रयत्न केला. १७० चा धावसंख्या गाठली जाऊ शकत होती. आम्ही चांगली सुरुवात केली होती तरी देखील केकेआर विजयाच्या जवळ पोहोचले. हे कौतुकास्पद आहे.”

जडेजाने १९ व्या षटकात तुफान फटकेबाजी केली आणि निर्णायक २२ धावा केल्या. आयपीएल आधी अनेक आठवडे तो इंग्लंडविरुद्ध कसोटी सामना खेळला असल्यामुळे त्यानंतर लगेच आयपीएमध्ये खेळने कठीण असल्याचे त्याने सांगितले आहे. सामना संपल्यानंतर रवींद्र जडेजा म्हणाला, “हे अवघड असते. तुम्ही पाच दिवसांचे क्रिकेट खेळत असता आणि नंतर मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये खेळता. मी माझ्या फलंदाजीवर काम करत होतो. १९ व्या षटकात बनवलेल्या धावांनी सामन्याची दिशा बदलली. मात्र, ऋतुराज (गायकवाडञ आणि फाफने (डू प्लेसिसि) आम्हाला चांगली सुरुवात करून दिली होती.”

दरम्यान, सामन्यात केकेआरने प्रथम फलंदाजी करत चेन्नईसमोर १७२ धावांचे लक्ष्य ठेवले होते. चेन्नईचे सलामीवीर फाफ डू प्लेसिस (३० चेंडूत ४५ धावा) आणि ऋतुराज गायकवाड (२८ चेंडूत ४० धावा) यांनी चांगली सुरुवात करून दिली होती.

मात्र, सामन्याच्या निर्णायक क्षणी जडेजाने एका षटकात दोन चौकार आणि दोन षटकार ठोकले आणि चेन्नईच्या विजयामध्ये महत्वाचे योगदान दिले. रवींद्र जडेजाला मॅन ऑफ द मॅच निवडले गेले. या विजयासह चेन्नई १० सामन्यांमध्ये १६ गुणांसह पुन्हा गुणतालिकेत पहिल्या स्थानावर पोहचली आहे. केकेआर या पराभवानंतर १० सामन्यांनंतर ८ गुणांसह चौथ्या स्थानावर आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

हृदय जिंकलस! टीम इंडिया आधी आयपीएलमधील वैर नंतर; विराटची निराश झालेल्या इशान अन् रोहितशी भेट

पराभव लागला जिव्हारी, रोहित शर्माने मुंबईच्याच ‘या’ खेळाडूंवर साधला निशाणा

धमाका! पुढील वर्षीच्या आयपीएल लीलावात ‘या’ पुणेकरासह पाच प्रतिभावान खेळाडू होणार मालामाल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---