जगातील सर्वात मोठा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म असलेल्या ट्विटरने नुकताच एक मोठा निर्णय घेतला. त्यांनी भारतीय क्रिकेट संघाचा सर्वात यशस्वी कर्णधार एमएस धोनी याच्या ट्विटर अकाऊंटवरुन ब्लू टिक हटवली होती. ट्विटरच्या पॉलिसीनुसार हा निर्णय घेतला गेल्याचे समजत होते. यानंतर अनेक क्रिकेट चाहत्यांनी निराशा व्यक्त करत पुन्हा ब्लू टिक लावण्याची मागणी केली होती. अखेर एका तासाच्या आतच ट्विटरने धोनीच्या अकाउंटपुढे ब्लू टिक लावली आहे.
या कारणाने हटवली ब्लू टिक
अमेरिकास्थित ट्विटर हा जगातील सर्वात मोठ्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मपैकी एक मानला जातो. नामांकित लोक व सेलिब्रिटी यांचे अकाउंट सहज ओळखता यावे याकरता ट्विटर त्यांच्या नावापुढे निळ्या रंगाची बरोबरची खूण असलेले चिन्ह (ब्लू टिक) लावते.
भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी याच्या नावापुढील ही ब्लू टिक ट्विटरने आज हटवली गेली होती. ट्विटरच्या पॉलिसीनुसार कोणताही ब्लू टिक असलेला ट्विटर वापरकर्ता सहा महिने ट्विटरवर सक्रीय नसल्यास त्याची ब्लू टिक हटविण्यात येते. धोनीने आपले अखेरचे ट्वीट ८ जानेवारी रोजी केले होते. त्या नियमानुसार ही ब्लू टिक हटविली गेल्याचे सांगण्यात येत आहे. धोनी सहसा सोशल मिडियाचा जास्त वापर करत नाही. त्याची पत्नी साक्षी ही इंस्टाग्रामच्या माध्यमातून धोनीची छायाचित्रे शेअर करत असते. सध्या धोनीचे ट्विटरवर ८.२ मिलियन अनुसारक आहेत.

चाहत्यांच्या आल्या अशा प्रतिक्रिया
धोनीची ट्विटरवरून ब्लू टिक हटवल्यानंतर चाहत्यांनी निराशा व्यक्त केली होती. अनेकांनी त्याची ब्लू टिक परत करण्याची मागणी केली. तर, काहींनी यामुळे धोनीला काहीही फरक पडणार नसल्याचे म्हटले. काही चाहत्यांनी मजेशीर मीमदेखील शेअर केले आहेत. अखेर धोनीप्रेमींची मागणी पूर्ण झाली आहे.
https://twitter.com/MsD_7289/status/1423618971455000581?s=20
Raina going to twitter office to get blue tick for ms dhoni Blue heart#blueTick #MSDhoni pic.twitter.com/3Us3tJ3N8V
— Ankit singh (@Ankitku15995287) August 6, 2021
Relax Boys #blueTick Aa Gya He Wapis !! ????????????@msdhoni ,#msdhoni #whistlepoddu pic.twitter.com/DJxPO73JWV
— Myself_@bhi (@Royalstag_abhi) August 6, 2021
Blue tick back again#MSDhoni pic.twitter.com/XzTrjYr8j6
— अभिषेक_कुमार ???????? (@Abhishek887777) August 6, 2021
आयपीएलमध्ये खेळताना दिसेल धोनी
वर्षभरापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झालेला धोनी सप्टेंबर महिन्यात इंडियन प्रीमियर लीगच्या (आयपीएल) उर्वरित हंगामात चेन्नई सुपर किंग्सचे नेतृत्व करताना दिसेल. आयपीएल २०२० मध्ये चेन्नईला सातव्या क्रमांकावर समाधान मानावे लागले होते. कोरोना महामारीमुळे अर्ध्यातून स्थगित केल्या गेलेल्या आयपीएल २०२१ मध्ये चेन्नई दुसऱ्या क्रमांकावर काबीज आहे. चेन्नईने धोनीच्या नेतृत्वात आतापर्यंत तीन आयपीएल विजेतेपदे पटकावली आहेत.
महत्त्वाच्या बातम्या-
सपशेल फ्लॉप पुजाराच्या समर्थनार्थ उतरला माजी क्रिकेटर; म्हणे, ‘चांगल्या चेंडूवर बाद झाल्यास…’
सर्वकालीन महान वेगवान गोलंदाज होण्यापासून अँडरसन एक पाऊल दूर, आज होणार भीमपराक्रम!
मोठ्या दिलाची माणसं! क्वारंटाईनमध्ये असलेल्या सूर्याची ‘शर्मा फॅमिली’ने घेतली भेट, बघा व्हिडिओ






