भारतीय क्रिकेट संघ सध्या वेस्ट इंडीज दौऱ्यावर आहे. या दौऱ्याला 12 जुलैपासून सुरुवात होईल. कसोटी संघाचा कर्णधार म्हणून रोहित शर्मा याच्याकडे जबाबदारी कायम ठेवली आहे. मात्र, जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतून पुनरागमन केलेल्या अनुभवी अजिंक्य रहाणेकडे पुन्हा एकदा संघाचे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. रहाणेला ही जबाबदारी मिळाल्यानंतर अनेक जण त्याचे कौतुक करत असतानाच, भारतीय निवड समितीचे माजी अध्यक्ष एमएसके प्रसाद यांनी निवड समितीच्या या निर्णयानंतर आपली प्रतिक्रिया दिली आहे.
तब्बल दीड वर्षानंतर भारतीय संघात पुनरागमन करत असताना त्याने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीच्या पहिल्या डावात 89 तर दुसऱ्या डावात 46 धावा केल्या होत्या. त्यानंतर आता तो पुन्हा एकदा भारतीय कसोटी संघात नियमित सदस्य होऊ शकतो, असे प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी म्हटले होते. त्यानंतर आता त्याला थेट संघाचा उपकर्णधार बनवण्यात आले. याच मुद्द्यावर बोलताना प्रसाद म्हणाले,
“अजिंक्य रहाणे पुनरागमन केल्यानंतर पुन्हा संघाचा उपकर्णधार बनू शकतो तर विराटला पुन्हा कर्णधार का बनवले जाऊ शकत नाही? विराटच्या नेतृत्वाबद्दल संघ व्यवस्थापनाची मानसिकता काय आहे हे माहीत नाही? मात्र, रोहितला लवकर हटवणार असाल तर पुढील विचार करून विराटलाच कर्णधार करण्यास काही हरकत नाही.”
अनेक वादग्रस्त घडामोडीनंतर विराटने 2021 टी20 विश्वचषकानंतर मर्यादित षटकांच्या संघाचे कर्णधारपद सोडले होते. त्यानंतर, दक्षिण आफ्रिका दौऱ्यानंतर त्याने कसोटी कर्णधारपदाचा देखील राजीनामा दिला होता. सध्या तो केवळ फलंदाज म्हणून संघाचा भाग आहे. मात्र, अनेकदा पुन्हा एकदा त्याला कसोटी कर्णधार बनवण्याची मागणी समोर येत असते.
(MSK Prasad Said If Rahane Become Vice Captain Then Why Not Virat Captain Again)
महत्वाच्या बातम्या-
वेस्ट इंडिजमध्ये नेहमीच तळपते मराठमोळ्या अजिंक्यची बॅट, आतापर्यंतचा रेकॉर्ड 140 कोटी भारतीयांची मान उंचावणारा
‘बिल्कुल नाही, ऑस्ट्रेलियाला या पराभवाचा…’, इंग्लंडविरुद्ध हारताच कमिन्सचे मोठे विधान, लगेच वाचा