नवी दिल्ली। भारतीय संघ या वर्षाच्या शेवटी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. या दौऱ्यात भारतीय संघाला ३ आंतरराष्ट्रीय टी२० सामने, ४ कसोटी सामने आणि ३ वनडे सामन्यांची मालिका खेळायची आहे. या दौऱ्यासाठी भारतीय संघाचे माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद यांनी आपल्या आवडत्या २६ खेळाडूंची निवड केली आहे.
या दौऱ्याबद्दल बोलताना भारतीय संघाचे माजी निवडकर्ता एमएसके प्रसाद यांनी म्हटले की, या दौऱ्यासाठी भारतीय संघाने मोठ्या संख्येने खेळाडूंना पाठविले पाहिजे. ते पुढे म्हणाले, मुख्य खेळाडूंबरोबर भारत अ संघाच्या खेळाडूंनाही पाठविले पाहिजे.
त्यांनी या दौऱ्यासाठी निवडलेल्या २६ खेळाडूंमध्ये कसोटी आणि वनडे दोन्ही संघाच्या खेळाडूंचा समावेश आहे. परंतु त्यांनी भारतीय संघाचा माजी कर्णधार एमएस धोनीला (MS Dhoni) मात्र यातून वगळले आहे. त्यांनी सलामीवीर शिखर धवनचाही (Shikhar Dhawan) संघात समावेश केलेला नाही.
प्रसाद यांनी आपल्या संघात सलामीवीर म्हणून रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ आणि केएल राहुल यांना सामील केले आहे. त्याचबरोबर मधल्या फळीत फलंदाजीसाठी विराट कोहली, अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर यांना सामील केले आहे.
ऑस्ट्रेलिया दौऱ्याबद्दल (Australia tour) बोलताना ते म्हणाले, दौऱ्यादरम्यान कोणत्याही खेळाडूला समस्या आली, तर आपल्याकडे मजबूत बॅकअप असायला हवा. पुढे बोलताना ते म्हणाले की, सरावासाठी भारतीय फलंदाजांना अधिक समस्या होणार नाही. कारण चांगले गोलंदाज असतील. त्यांनी पुढे म्हटले की, भारत अ संघाच्या गोलंदाजांच्या उपस्थितीमुळे मुख्य गोलंदाजांवर अधिक ताण पडणार नाही.
एमएसके प्रसाद यांनी निवडलेल्या २६ सदस्यीय भारतीय संघ-
सलामीवीर- रोहित शर्मा, मयंक अगरवाल, पृथ्वी शॉ, केएल राहुल
मधली फळी- विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, हनुमा विहारी, शुबमन गिल, श्रेयस अय्यर
यष्टीरक्षक- रिषभ पंत, वृद्धिमान साहा
फिरकीपटू- आर अश्विन, रवींद्र जडेजा, शाहबाज नदीम, राहुल चाहर, कुलदीप यादव
अष्टपैलू- हार्दिक पंड्या
वेगवान गोलंदाज- इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव, नवदीप सैनी, खलील अहमद, शार्दुल ठाकूर
(मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी गोलंदाज- दीपक चाहर, युझवेंद्र चहल, कृणाल पंड्या)
ट्रेंडिंग घडामोडी-
-सचिन तेंडुलकरच्या त्या एका सल्ल्याने वाचवलं होतं विराट कोहलीच करियर
-लाल रंगाची टोपी घालून इंग्लंडचे खेळाडू खेळणार आहेत तिसरा कसोटी सामना? पहा कारण
-वेस्ट इंडिज गोलंदाजाच्या खतरनाक चेंडूवर बेन स्टोक्स झाला त्रिफळाचीत; पहा अफलातून व्हिडिओ