ऑक्टोबर-नोव्हेंबर दरम्यान टी-२० विश्वचषक स्पर्धा खेळवण्यात येणार असून युएई आणि ओमान या देशांत विश्वचषकाचे सामने होणार आहेत. भारत या स्पर्धेचे यजमानपद भूषवणार होता, परंतू भारतातील कोरोनाचा वाढता प्रार्दुभाव पाहता आणि आयपीएलमध्ये कडक बायो-बबल असतानाही कोरोनाचा शिरकाव झाला होता. त्यामुळे आयसीसीने या स्पर्धेला युएई आणि ओमानमध्ये खेळवण्याचा निर्णय घेतला आहे.
दरम्यान, टी-२० विश्वचषक स्पर्धा सुरू होण्यापूर्वी बरेचसे माजी खेळाडू विश्वचषक स्पर्धेसाठी आपआपला संघ निवडताना दिसत आहे. त्यातीलच एक म्हणजे भारतीय संघाचे माजी मुख्य निवडकर्ते एमएसके प्रसाद. त्यांनी नुकताच आगामी टी-२० विश्वचषकासाठी संभाव्य संघ निवडला आहे.
प्रसाद म्हणाले, “भारतीय संघात सलामीसाठी रोहित शर्मा, शिखर धवन आणि पृथ्वी शॉ हे तीन सलामीचे फलंदाज असतील. हे तीघेही सध्या चांगल्या फॉर्ममध्ये आहेत. त्याचबरोबर मधल्या फळीत विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल आणि रिषभ पंतचा समावेश असेल.”
राहुलच्या मधल्या फळीत खेळण्याबाबत ते म्हणाले, “राहुलने भारतीय टी-२० संघात मधल्या फळीतच खेळावे. कारण, ही स्पर्धा आशियाई जमिनीवर खेळण्यात येणार आहे. अशावेळी तो मधल्या फळीत महत्वाची भूमिका बजावू शकतो”.
या युवा खेळाडूंनाही संधी मिळण्याची शक्यता-
प्रसाद यांच्या मते, “भारतीय संघाची मधली फळी एकदम मजबूत आहे. संघात कोहली, यादव यांच्यानंतर ईशान किशन आणि संजू सॅमसन या दोन युवा खेळाडूंपैकी एकाला संघात स्थान मिळू शकते. परंतू संघात आधीच दोन यष्टिरक्षक असल्याने तिसऱ्या यष्टिरक्षकाचा समावेश होण्याची शक्यता कमी आहे. त्याचबरोबर पर्याय म्हणून हार्दिक पांड्याला संधी मिळू शकते.”
या गोलंदाजांना मिळू शकते संघात स्थान-
“टी-२० विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय संघ पाच फिरकीपटूंऐवजी वॉशिंग्टन सुंदर, रविंद्र जडेजा आणि कृणाल पांड्याला संघात स्थान देतील. त्याचबरोबर यांच्यासोबतीला वरुण चक्रवर्ती किंवा युजवेंद्र चहलला चौथा गोलंदाज म्हणून संधी मिळू शकते. जलदगती गोलंदाजीत टी नटराजनला संघातून डच्चू मिळण्याची शक्यता आहे. या ऐवजी भारतीय संघ भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि मोहम्मद शमी या चार खेळाडूंसोबत खेळताना दिसू शकतो,” असेही प्रसाद म्हणाला.
एमएसके प्रसाद यांनी टी-२० विश्वचषकासाठी निवडलेला भारताचा संभाव्य संघ –
शिखर धवन, रोहीत शर्मा, पृथ्वी शॉ, विराट कोहली(कर्णधार) सूर्यकुमार यादव, केएल राहुल, रिषभ पंत, ईशान किशन/संजू सॅमसन, हार्दिक पांड्या, रविंद्र जडेजा, वॉशिंग्टन सुंदर, कृणाल पांड्या, वरूण चक्रवती/युजवेंद्र चहल, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज, मोहम्मद शमी
महत्वाच्या बातम्या –
–ट्विटरने अचानक हटवली माहीच्या अकाउंटवरची ‘ब्लू टिक’; मग झालं असं काही की, लगेच सुधारली चूक
–सपशेल फ्लॉप पुजाराच्या समर्थनार्थ उतरला माजी क्रिकेटर; म्हणे, ‘चांगल्या चेंडूवर बाद झाल्यास…’