पुणे, 21 सप्टेंबर2022: महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना यांच्या वतीने व पुणे मेट्रोपॉलिटन जिल्हा टेनिस संघटना व डेक्कन जिमखाना यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एमएसएलटीए बी1 आशियाई कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत एकेरीत मुलांच्या गटात भारताच्या मानस धामणे, युवान नांदल, आर्यन शाह, अमन दहिया यांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत मुख्य ड्रॉच्या उपांत्यपुर्व फेरीच्या लढतीत मुलांच्या गटात भारताच्या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन केले. पाचव्या मानांकित मानस धामणेने जपानच्या तकमासा मिशिरो यांचा 6-2, 6-4 असा तर तिस-या मानांकित युवान नांदलने जपानच्या आठव्या मानांकित रिया हत्तोरीचा 6-2, 7-5 असा पराभव करत उपांत्य फेरीत धडक मारली. सहाव्या मानांकित आर्यन शाहने कोरीयाच्या चौथ्या मानांकित वूह्युक चांग याला पराभवाचा धक्का देत 6-4, 6-4 असा विजय मिळवला. दुस-या मानांकितअमन दहिया याने थायलंडच्या सुफावत साओई याचा 6-1, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
एकेरीत मुलींच्या गटात उपांत्यपुर्व फेरीत ऑस्ट्रेलियाच्या सहाव्या मानांकित भारताच्या दुस-या मानांकित श्रुती अहलावतने कझाकस्तानच्या असिल्झान आरिस्टनबेकोवा हिचा 6-1, 6-0 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. तैपेईच्याअव्वल मानांकित यू-युन ली हिने भारताच्या सोनल पाटीलचा 6-2, 6-2 असा तर लिली टेलरने भारताच्या चौथ्या मानांकित वैष्णवी आडकरचा 7-5, 3-6, 6-4 असा पराभव केला. ऑस्ट्रेलियाच्या तिस-या मानांकित इमर्सन जोन्सने भारताच्या पाचव्या मानांकित सुहिता मारुरीचा 6-3, 6-2 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
दुहेरीत मुलांच्या गटात भारताच्या चौथ्या मानांकित जोड रुशील खोसला व युवन नंदल यांनी भारताच्याच आर्यन लक्ष्मणन व रेथिन प्रणव सेंथिल कुमार यांचा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात भारताच्या अस्मी अडकर व वैष्णवी अडकर याजोडीने व्लादिस्लावा अँड्रीव्स्काया व सुहिता मारुरी यांचा 6-0, 6-4 असा पराभव करत उपांत्य फेरीत प्रवेश केला.
स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुख्य ड्रॉ: एकेरी: (उपांत्यपुर्व फेरी): मुले:
मानस धामणे (भारत) [5] वि.वि तकमासा मिशिरो (जपान) 6-2, 6-4;
युवान नांदल (भारत) [3] वि.वि रिया हत्तोरी (जपान) [8] 6-2, 7-5;
आर्यन शाह (भारत) [6] वि.वि वूह्युक चांग (कोरीया) [4] 6-4, 6-4;
अमन दहिया (भारत) [2] वि.वि सुफावत साओई (थायलंड) 6-1, 6-4;
मुली:
लिली टेलर(ऑस्ट्रेलिया)[6]वि.विवैष्णवी आडकर (भारत) [4] 7-5, 3-6, 6-4;
यू-युन ली (तैपेई) [1] वि.वि सोनल पाटील (भारत) 6-2, 6-2;
इमर्सन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [3]वि.वि सुहिता मारुरी (भारत) [5] 6-3, 6-2;
श्रुती अहलावत (भारत) [2] वि.वि असिल्झान आरिस्टनबेकोवा (कझाकस्तान) 6-1, 6-0
दुहेरी: उपांत्यपुर्व फेरी:
मुलेरुशील खोसला (भारत) /युवन नंदल (भारत) [4] पुढेचाल.वि आर्यन लक्ष्मणन (भारत) /रेथिन प्रणव सेंथिल कुमार (भारत) 2-0(सामना सोडून दिला) ;
शिंगो मसुदा (जपान)/सतोरू नाकाजिमा (जपान)वि.वि पुन्थॉन्ग कोमोपिसुत (थायलंड)/राजता थमचारोएनसातित (थायलंड) 7-6(2), 6-4;
वूह्युक चांग (कोरीया)[3]/रिया हत्तोरी (जपान)वि.वि मानस धामणे (भारत) /आर्यन शाह (भारत) 6-4, 7-6(1);
सिवानत औतायकुल (थायलंड)/सुफवत साओई (थायलंड )वि.वि बुशन हाओबम (भारत) /दक्ष प्रसाद (भारत) 6-3, 7-6(3);
मुली:
श्रुती अहलावत (भारत) /यु-युन ली (तैपेई) [1] वि.वि यू किकावा (जपान)/रिओको उमेकुनी (जपान) 6-1,6-2
लिली फेअरक्लॉ (ऑस्ट्रेलिया) /झारा लार्के (ऑस्ट्रेलिया) [3] वि.वि जो-लीन सॉ (मलेशिया)/शिहो त्सुजियोका (जपान) 6-4,6-4;
अस्मी अडकर (भारत) /वैष्णवी अडकर(भारत) वि.वि व्लादिस्लावा अँड्रीव्स्काया (कझाकस्तान)[4]/सुहिता मारुरी(भारत) 6-0, 6-4;
इमर्सन जोन्स (ऑस्ट्रेलिया) [2]/लिली टेलर(ऑस्ट्रेलिया)वि.वि ऋषिता रेड्डी बसिरेड्डी (भारत) /सोहिनी संजय मोहंती (भारत) 6-4,6-3