एमएसएलटीए-योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत महाराष्ट्राच्या विनिथ मुत्याला, सिद्धार्थ मराठे, परी चव्हाण यांचा अंतिम फेरीत प्रवेश

औरंगाबाद। एड्युरन्स्‌ मराठवाडा-एमएसएलटीए टेनिस सेंटर(इएमएमटीसी)यांच्या तर्फे आयोजित एमएसएलटीए – योनेक्स्‌ सनराईज्‌ 14 वर्षाखालील राष्ट्रीय टेनिस स्पर्धेत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या विनिथ मुत्यालाने दिल्लीच्या अधिरी अवलचा तर सिद्धार्थ मराठेने महाराष्ट्राच्या जैष्णव शिंदेचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. मुलींच्या गटात महाराष्ट्राच्या परी चव्हाणने सायना देशपांडेचा पराभव करत अंतिम फेरी गाठली

इएमएमटीसी टेनिस कोर्ट,डिव्हिजनल स्पोर्टस्‌ कॉम्पलेक्स्‌ येथे सुरू असलेल्या या स्पर्धेत उपांत्य फेरीत मुलांच्या गटात महाराष्ट्राच्या विनिथ मुत्यालाने दिल्लीच्या अधिरी अवलचा 7-6(6), 0-6, 6-3 असा टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. महाराष्ट्राच्या सिद्धार्थ मराठेने आपला राज्य सहकारी जैष्णव शिंदेचा 6-1, 6-1 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुहेरी गटात महाराष्ट्राच्या काहिर वारीकने कर्नाटकच्या ऋषिल खोसलाच्या साथीत हरियाणाच्या वंश नांदल व वितिन राठी या जोडीला 6-4, 3-6, 10-1 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

मुलींच्या उपांत्य फेरीत महाराष्ट्राच्या नवव्या मानांकीत परी चव्हाणने आपल्या राज्य सहकारी सायना देशपांडेचा 7-6(6),0-6, 6-3 असा टायब्रेकमध्ये पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला. तमिळनाडूच्या चौथ्या मानांकीत कुंदना भंडारूने महाराष्ट्राच्या सहाव्या मानांकीत रुमा गायकैवारीचा 6-4, 6-2 असा पराभव करत अंतिम फेरी गाठली. दुहेरीच्या विजेतेपदासाठीच्या लढतीत तमिळनाडूच्या कुंदना भंडारूने मध्य प्रदेशच्या काश्वि शुक्लाच्या साथीत दिल्लीच्या रिया सचदेव व हरियाणाच्या नंदिनी दिक्षितचा 6-1,6-4 असा पराभव करत दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

स्पर्धेचा सविस्तर निकाल:

मुले: उपांत्य फेरी:
विनिथ मुत्याला(महाराष्ट्र) वि.वि अधिरी अवल(दिल्ली) 7-6(6), 0-6, 6-3
सिद्धार्थ मराठे(महाराष्ट्र)वि.वि. जैष्णव शिंदे(महाराष्ट्र) 6-1, 6-1

दुहेरी गट- अंतिम फेरी- मुले
काहिर वारीक(महाराष्ट्र)/ऋषिल खोसला(कर्नाटक) वि.वि वंश नांदल(हरियाणा)/वितिन राठी(हरियाणा) 6-4, 3-6, 10-1

मुली: उपांत्य फेरी:
परी चव्हाण(9)(महाराष्ट्र) वि.वि सायना देशपांडे(महाराष्ट्र) 7-6(6),06, 6-3
कुंदना भंडारू(4)(तमिळनाडू) वि.वि रुमा गायकैवारी(6)(महाराष्ट्र)6-4, 6-2

दुहेरी गट- अंतिम फेरी- मुली
कुंदना भंडारू(तमिळनाडू)/काश्वि शुक्ला(मध्य प्रदेश) वि.वि रिया सचदेव(दिल्ली)/नंदिनी दिक्षित(हरियाणा) 6-1,6-4

You might also like

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.