वनडे विश्वचषक 2023 मध्ये शुक्रवारी (3 नोव्हेंबर) नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान संघ आमने सामने आहेत. नेदरलँड्सने या सामन्यात नेदरलँड्सने नाणेफेक जिंकली आणि प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. अफगाणिस्तान संघाला प्रथम गोलंदाजी करावी लागली. पण त्यांचा फिरकीपटू मुजीब उर रहमान याला नेदरलँड्सची पहिली विकेट स्वस्तात मिळवली. सोबतच वनडे कारकिर्दीतील मैलाचा दगड पार केला.
मुजीब उर रहमान (Mujeeb Ur Rahman) अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा एक अनुभवी फिरकी गोलंदाज आहे. शुक्रवारी (3 नोव्हेंबर) नेदरलँड्स आणि अफगाणिस्तान यांच्यातील सामन्यात पहिल्या षटकात त्याला गोलंदाजीसाठी संधी दिली गेली. सामन्याती या पहिल्याच षटकात त्याने पाचव्या चेंडूवर वेस्ली बॅरेसी याला पायचीत केले. 4 चेंडू खेळून बॅरेसी तंबूत परतला. वनडे क्रिकेटमध्ये मुजीबची ही 100वी विकेट ठरली. मुजीब अफगाणिस्तानसाठी 100 वनडे विकेट्स घेणारा केवळ चौथा गोलंदाज ठरला आहे. वयाच्या अवघ्या 22व्या वर्षी त्याने ही मोठी कामगिरी केली असून येत्या काळात तो वनडे क्रिकेटमधी दिग्गज गोलंदाजांमध्ये गणला जाऊ शकतो. (Mujeeb ur Rahman crossed the 100-wicket mark in ODI cricket)
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन –
नेदरलँड्स – वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
अफगाणिस्तान – रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इकराम अलीखिल, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारूखी, नूर अहमद
दरम्यान, वनडे विश्वचषक 2023 मध्ये भारतीय संघ सध्या पहिल्या क्रमांकावर आहे. भारतालाने विश्वचषकातील सुरुवातीच्या सात पैकी सात सामने जिंकले आहेत. सात पैकी सहा विजयांसह दक्षिण आफ्रिका दुसऱ्या, तर सहा पैकी चार विजयांसह ऑस्ट्रेलिया तिसऱ्या क्रमांकावर आहे. अफगाणिस्तानने सुरुवातीच्या सहा पैकी तीन सामने जिंकले आहेत आणि त्यांचा संघ गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे. दुसरीकडे नेदरलँड्स संघ आठव्या क्रमांकावर आहे. आतापर्यंत खेळलेल्या सहा सामन्यांपैकी दोन सामने नेदरलँड्सने जिंकले आहेत. गुणतालिकेत सर्वात शेवटचा क्रमांक इंग्लंडसारख्या बलाढ्य संघाकडे आहे. इंग्लंड सुरुवातीच्या सहा पैकी फक्त एक सामना जिंकला आहे.
महत्वाच्या बातम्या –
नवाबांच्या शहरात नेदरलँड्सने जिंकला Toss, विराटशी भांडण संपवणारा खेळाडू अफगाणी ताफ्यातून बाहेर
शमीने 5 विकेट्स घेत ड्रेसिंग रूमकडे केला इशारा, गिलने केला खुलासा; म्हणाला, ‘तो प्रशिक्षक…’