वनडे विश्वचषक 2023 स्पर्धेतील 33 सामने पार पडले आहेत. तसेच, स्पर्धेतील 34वा सामना लखनऊच्या भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना क्रिकेट स्टेडिअम येथे खेळला जाणार आहे. या सामन्यात नेदरलँड्स विरुद्ध अफगाणिस्तान संघ आमने-सामने असणार आहेत. या सामन्याला भारतीय प्रमाणवेळेनुसार, दुपारी 2 वाजता सुरू होणार आहे. त्यापूर्वी उभय संघात नाणेफेक झाली. ही नाणेफेक नेदरलँड्सचा कर्णधार स्कॉट एडवर्ड्स याने जिंकली असून फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.
या सामन्यासाठी नेदरलँड्सने संघात एक बदल केला आहे. विक्रमजीत सिंग बाहेर पडला असून त्याच्या जागी वेस्ली बारेसी याची संघात एन्ट्री झाली आहे. दुसरीकडे, अफगाणिस्तान संघातही बदल आहे. विराट कोहली (Virat Kohli) याच्याशी वाद मिटवून मैत्री करणारा नवीन उल हक (Naveen Ul Haq) याला संघातून बाहेर केले असून त्याच्या जागी संघात नूर अहमदला संधी दिली आहे.
स्पर्धेत कोण मजबूत स्थितीत?
विश्वचषक 2023 (World Cup 2023) स्पर्धेतील उभय संघांची कामगिरी पाहायची झाली, तर अफगाणिस्तान संघ मजबूत स्थितीत दिसतो. त्यांनी आतापर्यंत 6 सामने खेळले असून त्यातील 3 सामने जिंकले आहेत आणि 3 सामन्यांवर त्यांना पाणी सोडावे लागले आहे. या 3 विजयानंतर त्यांनी 6 गुणांसह पॉईंट्स टेबलमधील सहावे स्थान मिळवले आहे. अशात नेदरलँड्सविरुद्ध विजय मिळवत ते पाचव्या स्थानी जाण्याचा प्रयत्न करतील.
दुसरीकडे, नेदरलँड्स संघानेही 6 सामने खेळले आहेत. त्यात त्यांना फक्त 2 सामने जिंकण्यात यश आले आहे. तसेच, उर्वरित 4 सामन्यात त्यांना पराभवाचा धक्का बसला आहे. ते 4 गुणांसह पॉईंट्स टेबलमध्ये आठव्या स्थानी आहेत. अशात हा सामना जिंकत नेदरलँड्स संघ पॉईंट्स टेबलमधील आपली जागा भक्कम करण्याचा प्रयत्न करेल. (Netherlands have won the toss and have opted to bat against afghanistan)
विश्वचषकातील 34व्या सामन्यासाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
नेदरलँड्स
वेस्ली बॅरेसी, मॅक्स ओ’डौड, कॉलिन एकरमन, सीब्रँड एंजेलब्रेच, स्कॉट एडवर्ड्स (यष्टीरक्षक/कर्णधार), बास डी लीडे, साकिब झुल्फिकार, लोगन व्हॅन बीक, रोएलॉफ व्हॅन डर मर्व्ह, आर्यन दत्त, पॉल व्हॅन मीकेरेन
अफगाणिस्तान
रहमानुल्लाह गुरबाज, इब्राहिम झादरान, रहमत शाह, हशमतुल्लाह शाहिदी (कर्णधार), इकराम अलीखिल, अझमतुल्लाह उमरझाई, मोहम्मद नबी, राशिद खान, मुजीब उर रहमान, फझलहक फारूखी, नूर अहमद
हेही वाचा-
‘वन टू का फोर…’, गाणं वाजताच विराटने लावले ठुमके, पाहून तुमचेही थिरकतील पाय; पाहा व्हिडिओ
शमीने 5 विकेट्स घेत ड्रेसिंग रूमकडे केला इशारा, गिलने केला खुलासा; म्हणाला, ‘तो प्रशिक्षक…’