शारजाह । येथे सुरु असलेल्या आयर्लंड विरुद्ध अफगाणिस्तान यांच्यातील पहिल्या वनडे सामन्यात मुजीब झर्दन या अफगाणिस्तानच्या १६ वर्षीय खेळाडूने आंतरराष्ट्रीय पदार्पण केले. २१व्या शतकात जन्मलेला तो पहिला खेळाडू ठरला आहे ज्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले आहे.
तीन सामन्यांच्या या मालिकेत आयर्लंड संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यात त्याला वनडे कॅप देण्यात आली.
मुजीब झर्दनचा जन्म २८ मार्च २००१ रोजी झाला आहे. त्याने एसीसी अंडर १९ स्पर्धेत अफगाणिस्तानलाकडून विजयात मोलाचा वाटा उचलला होता. त्यामुळे त्याची निवड या संघात करण्यात आली आहे.
सध्या त्याचे वय १६ वर्षे ८ महिने आणि ७ दिवस आहे. त्याने आजपर्यंत लिस्ट अचे ६ सामने खेळले आहेत.