एका संघमालकाने आपल्या संघातील खेळाडूच्या प्रवासासाठी, थेट स्वत:चे प्रायव्हेट जेट प्लेन देणे, हे ऐकणेच अनेकांसाठी आश्चर्याची गोष्ट ठरु शकते. अनेकांचा यावर विश्वासही बसणार नाही, पण होय असे झाले आहे, तेही आयपीएलमध्ये. आपल्या हॅपी गो लकी स्वभावासाठी प्रसिद्ध असणारा चॅम्पियन ड्वेन ब्रावो, हे कॅरेबियन बेटांबरोबरच भारतीय क्रिकेट वर्तुळात बरेच गाजलेले नाव. ब्रावो म्हटलं की, भारतीय चाहत्यांना चेन्नई सुपर किंग्सच्या जर्सीतला ब्रावो आठवतो. कदाचित अनेकांना माहित नसेल की, ब्रावो जसा सीएसकेसाठी महत्त्वाचा खेळाडू आहे, तसा तो मुंबई इंडियन्सचाही मॅचविनर होता. हो, ब्रावो आयपीएलचे पहिले तीन सिझन मुंबईकडून खेळला. याच ब्रावोसाठी मुंबईचे टीम ओनर मुकेश अंबानी यांनी स्वत:चे जेट प्लेन उपलब्ध करून दिलेले.
झाले असे की, पहिला आयपीएल सिझन सुरू असताना मेमध्ये ऑस्ट्रेलियन टीम वेस्ट इंडीज टूर वर जाणार होती. त्यामुळे टेस्ट सिरीजसाठी सिलेक्ट झालेल्या वेस्ट इंडीज प्लेयर्सना आयपीएल सोडून जमैकात जमायचे होते, पण मुंबई इंडियन्सच्या आग्रहाखातर ब्रावो वेस्ट इंडिज क्रिकेट बोर्डाची परवानगी घेऊन एक आठवडा ज्यादा भारतात थांबला.
टेस्ट सिरीज २२ हे पासून सुरू होणार होती. त्याआधी वेस्ट इंडिज खेळाडूंचा कॅम्प लागलेला. त्यामुळे सुरुवातीला ब्रावो सीएसकेविरुद्धच्या मॅचनंतर १५ मेला घरी जाणार होता, पण पुढच्या ४ दिवसात मुंबईच्या दोन मॅच होत्या. त्यामुळे मुकेश अंबानींनी त्याला १८ मे पर्यंत थांबण्याची विनंती केली. कारण, ब्रावो मुंबईसाठी महत्त्वाचा खेळाडू होता. त्याच्या असण्याने टीममध्ये चांगला माहोल राहत असल्याचे संघमालकांना वाटत होते. आता इतका मोठा माणूस विनंती करतोय म्हटल्यावर ब्रावो त्यांचं ऐकणार नाही असं कसं होऊ शकता. ब्रावो थांबला.
हेही पाहा- मोटा भाईंनी बायकोचे प्रायव्हेट जेट पाठवलेले ब्राव्होला
ज्या दोन मॅचसाठी ब्रावो थांबलेला, त्या दोन्ही मॅचला त्याने जबरदस्त ऑलराऊंड खेळ दाखवला. १८ तारखेला डेक्कन चार्जर्सविरूद्ध मॅच संपल्यानंतर लगेचच ब्रावो, अंबानींच्या जेट प्लेनमध्ये बसला आणि जमैकाला उड्डाण केले. १९ तारखेला ब्रावो वेस्ट इंडिजच्या कॅम्पमध्ये होता… असं नातं होतं ब्रावो आणि अंबानींच.
बरं हे जेट प्लेनही खास होतं. २००७ ला अंबानी जेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती बनले तेव्हा, त्यांनी त्या आनंदात आपल्या पत्नी नीता अंबानींना बर्थडे गिफ्ट म्हणून, त्यावेळी ६० मिलियन डॉलरचे ते प्रायव्हेट जेट प्लेन दिलेले. तरीही हे स्पेशल प्लेन आपल्या स्पेशल प्लेयरला दिलं.
ब्रावोने आपल्याला केलेली ही मदत कधी विसरली नाही. त्याने त्याच रिटर्न गिफ्ट एकप्रकारे मुंबई इंडियन्सला पुढच्या वर्षी दिलं. २००९ आयपीएल सीझनआधी ब्रावो इंजर्ड झाला. इंजर्ड असा झाला की, तो साऱ्या सिझनमध्येच खेळू शकणार नव्हता. मुंबईला त्याची रिप्लेसमेंट हवी होती. मुंबईच्या मॅनेजमेंटमध्ये चर्चा झाली त्यांना योग्य पर्याय सापडेना. त्यानंतर त्यांनी सरळ ब्रावोलाच याबाबत विचारणा केली. ब्रावोने नाव सुचवलं कायरन पोलार्ड. त्यावेळी हे नाव भारतात कोणाला माहीतही नव्हतं. १८-१९ वर्षाचा पोलार्ड तेव्हा वेस्ट इंडीजमध्ये नावारूपाला येत होता.
ब्रावो आणि मुंबई इंडियन्सने पोलार्डला अप्रोच केलं, पण त्यावेळी तो त्रिनिदाद अँड टोबॅगोशी कॉन्ट्रॅक्टेड होता. त्याला मुंबईसाठी खेळता येणार नव्हते. त्यावेळी दुसरा कॅरेबियन प्लेयर ड्वेन स्मिथचा पर्याय ब्रावोने सुचवला. असे असले, तरी मुंबईची नजर पोलार्डवरून हटली नाही. पोलार्डने त्या वर्षीची चॅम्पियन्स लीग गाजवली, तेव्हा मुंबईचे कोच रॉबिन सिंग आणि राहुल संघवी यांनी मुंबईशी कनेक्टेड राहण्यासाठी पोलार्डसोबत २ मिलियन डॉलर्स करार केलेला. एका १९ वर्षाच्या प्लेयरसाठी ही खूप मोठी संधी होती. आजही मुंबई इंडियन्सच्या संघमालक नीता अंबानी या पोलार्ड नावाचं वादळ मुंबई इंडियन्सला पहिल्यांदा दाखवल्याबद्दल ब्रावोचे आभार मानतात.
मुंबई इंडियन्स आयपीएलमधील सर्वात यशस्वी फ्रॅंचाईजी का आहे? याचं उदाहरण आपल्याला या दोन्ही प्रसंगातून दिसेल. आपल्या खेळाडूंच्या मदतीसाठी कोणत्याही मार्गाने अंबानी कुटुंब तयार असते. मग ते आपलं स्पेशल प्रायव्हेट जेट प्लेन द्यावं लागलं तरीही.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शारीरिक व्यंगावर मात करत ‘हे’ ५ क्रिकेटर्स बनले दिग्गज, टीम इंडियाच्या २ खेळाडूंचा समावेश





