---Advertisement---

महाराष्ट्राच्या मुकेशला लागली लॉटरी! थेट ‘या’ देशात खेळणार मानाची स्पर्धा

Mukesh-Choudhary
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीगच्या मागील हंगामात ज्या काही खेळाडूंनी लक्ष वेधून घेतले त्यापैकी एक होता चेन्नई सुपर किंग्सचा डावखुरा वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी. महाराष्ट्रासाठी देशांतर्गत क्रिकेट खेळणाऱ्या मुकेशने आपल्या स्विंगने भल्याभल्या फलंदाजांना गारद केले. त्याच्या या चांगल्या कामगिरीचे बक्षीस त्याला आता मिळाले आहे. तो लवकरच भारतीय संघासाठी खेळलेला युवा वेगवान गोलंदाज चेतन सकारियासह ऑस्ट्रेलियात एक मानाची टी२० स्पर्धा खेळण्यासाठी जाणार आहे.

या योजनेअंतर्गत ऑस्ट्रेलियाला जाणार मुकेश

ऑस्ट्रेलियाचे माजी वेगवान गोलंदाज डेनिस लिली यांनी जवळपास ३५ वर्षांपूर्वी चेन्नई येथे एमआरएफ पेस फाउंडेशनची स्थापना केली होती. याच अकादमीतून भारताला अनेक वेगवान गोलंदाज मिळाले. यात झहीर खान आरपी सिंग मुनाफ पटेल यांचा समावेश होतो. त्यानुसार, एमआरएफ पेस फाउंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील एक्सचेंज प्रोग्रामचा भाग म्हणून चेतन व मुकेश ब्रिस्बेनमध्ये वेळ घालवतील. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, ‘एमआरएफ पेस फाउंडेशन आणि क्रिकेट ऑस्ट्रेलिया यांच्यातील खेळाडू आणि प्रशिक्षकांची देवाणघेवाण जवळपास २० वर्षांपासून सुरू आहे. कोरोना व्हायरसमुळे गेल्या काही वर्षात हे थांबवण्यात आले होते. पण या दोन भारतीय खेळाडूंसोबत त्याची पुन्हा सुरुवात होत आहे.’

सकारियाने गेल्या वर्षी श्रीलंकेविरुद्ध वनडे आणि टी२० मध्ये पदार्पण केले होते. तत्पूर्वी त्याने राजस्थान रॉयल्ससाठी आयपीएल गाजवली होती. तर चौधरीने यंदाच्या आयपीएलमध्ये १३ सामन्यांत १६ विकेट घेतल्या होत्या.

सकारिया ऑस्ट्रेलियातील टी२० मॅक्स स्पर्धेत सनशाइन कोस्टकडून खेळणार आहे. तर २६ वर्षीय मुकेश विनम-मॅनलीचे प्रतिनिधित्व करेल. स्पर्धेत सहभागी होण्याव्यतिरिक्त, दोन्ही भारतीय गोलंदाज ‘बुपा नॅशनल क्रिकेट सेंटर’ येथे प्रशिक्षण घेतील. तसेच ‘क्वीन्सलँड बुल्स’च्या पूर्व-हंगामाच्या तयारीतही सहभागी होतील. टी२० मॅक्स स्पर्धा १८ ऑगस्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या-

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---