शुक्रवारी (२२ एप्रिल) मुंबईच्या डी वाय पाटील स्टेडियमवर आयपीएलमधील ‘एल क्लासिको’ सामना झाला. चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात रंगलेल्या या सामन्यात चेन्नईने अखेर ३ विकेट्सने बाजी मारली. या सामन्याचे नायक राहिले, चेन्नईचा दिग्गज क्रिकेटपटू एमएस धोनी आणि वेगवान गोलंदाज मुकेश चौधरी. त्याने सामन्यादरम्यान एक असा काही चेंडू टाकला, ज्यापुढे मुंबईचा सलामीवीर हतबल दिसला.
आयपीएल २०२२मधील (IPL 2022) या ३३व्या सामन्यात मुंबईने (MI vs CSK) प्रथम फलंदाजी करताना निर्धारित २० षटकांमध्ये ७ विकेट्सच्या नुकसानावर १५५ धावा केल्या. या डावादरम्यान चेन्नईकडून मुकेशने (Mukesh Choudhary) सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या. त्याने ३ षटके गोलंदाजी करताना १९ धावा देत मुंबईच्या ३ फलंदाजांना बाद केले. यात मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा, सलामीवीर इशान किशन (Ishan Kishan) आणि डेवाल्ड ब्रेविस यांचा समावेश होता.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
त्यातही मुकेशने मुंबईच्या १५.२५ कोटींचा फलंदाज इशानला शून्यावर त्रिफळाचीत (Ishan Kishan Bold On Zero) केले. डावातील पहिल्याच षटकातील पाचवा चेंडू त्याने असा काही टाकला की, इशानला तो चेंडू कळालाच नाही. मुकेशने हा यॉर्कर चेंडू फेकला, ज्याला अडवण्यासाठी इशानने बॅट पुढे केली. परंतु चेंडूच्या वेगामुळे इशानला फटका मारता आला नाही आणि तो तोल गेल्यामुळे मैदानावर खाली पडला. परिणामी चेंडू थेट यष्टीला जाऊन धडकला.
https://twitter.com/melange_twt/status/1517153518787825664?s=20&t=DIewJu_MOs3L3vHn0pCm7A
इशानव्यतिरिक्त रोहितलाही मुकेशने शून्य धावेवर बाद केले. तर ब्रेविसलाही ४ धावांवर पव्हेलियनला धाडले. त्याच्या या सामन्यातील जादुई स्पेलसाठी त्याला सामनावीर पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
Ishan Kishan clean bowled by Mukesh Chadhray #TATAIPL #RohitSharma #ishankishan #Wicket #IPL2022 https://t.co/P0r42BxGKN
— Shilpi sharma (@Itsshilpisharma) April 21, 2022
Choudhary bamboozles Ishan Kishan on IPL 2021: https://t.co/dcfXsJtTea
— jasmeet (@jasmeet047) April 21, 2022
दरम्यान मुकेशने आयपीएल २०२२मधील लखनऊ सुपरजायंट्सविरुद्धच्या सामन्यातून आपले आयपीएल पदार्पण केले होते. तेव्हापासून ते आतापर्यंत त्याने चेन्नईकडून ६ सामने खेळताना ७ विकेट्स घेतल्या आहेत. यादरम्यान त्याची सर्वोत्तम गोलंदाजी कामगिरी, १९ धावांवर ३ विकेट्स इतकी राहिली आहे. त्याने चेन्नईसाठी दीपक चाहरची जागा भरून काढली आहे, जो दुखापतीमुळे या पूर्ण हंगामातून बाहेर झाला आहे. मुकेशही चाहरप्रमाणे पावरप्लेमध्ये चेन्नईला विकेट्स मिळवून देण्याचे काम करत आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
शारजातील सचिनच्या ‘त्या’ वादळी खेळीवेळीची आयसीसी वनडे क्रमवारी
‘फिनिशर’ धोनीवर कौतुकाचा वर्षाव! हा दिग्गज तर म्हणतोय, ‘टी२० विश्वचषकासाठी निवृत्तीतून बाहेर ये’