---Advertisement---

तिसऱ्या टी20 पूर्वी सुट्टी घेत मुकेश कुमार पोहोचला घरी, ‘हे’ आहे कारण, चहर संघात सामील

On: मंगळवार, नोव्हेंबर 28, 2023 7:09 PM
---Advertisement---

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात 5 सामन्यांच्या टी20 मालिकेतील तिसरा सामना मंगळवारी ( 28 नोव्हेंबर) गुवाहाटी येथे खेळला जातोय. या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. मालिकेतील पहिले दोन सामने जिंकलेल्या भारतीय संघात या सामन्यासाठी एक महत्त्वाचा बदल केला गेला. वेगवान गोलंदाज मुकेश कुमार यांच्या जागी आवेश खान याला संधी मिळाली आहे. मुकेश याला या सामन्यातून बाहेर करण्याबाबत बीसीसीआयने पोस्ट करत खुलासा केला आहे.

तिसऱ्या सामन्यात मुकेश खेळणार नाही. याबाबत स्पष्टीकरण देताना बीसीसीआयने लिहिले, मुकेश याने संघ व्यवस्थापनाकडे विनंती केली होती की, तो तिसऱ्या सामन्यात खेळू शकणार नाही. लवकरच त्याचे लग्न होणार असल्याने ते विधी पार पाडण्यासाठी तो आपल्या घरी गेला. राजकोट येथील चौथ्या सामन्यापूर्वी तो संघात दाखल होईल. त्याच्या जागी दीपक चहर याला उर्वरित मालिकेसाठी भारतीय संघात समाविष्ट केले गेले आहे.

मुकेश याने पहिल्या दोन सामन्यात उत्कृष्ट गोलंदाजी केली होती. पहिल्या सामन्यातील अखेरच्या षटकात त्याने केवळ पाच धावा दिलेल्या. तर दुसऱ्या सामन्यात देखील त्याने नियंत्रण गोलंदाजी करत भारताच्या विजयात योगदान दिलेले.

भारत प्लेईंग इलेव्हन– यशस्वी जैस्वाल, रुतुराज गायकवाड, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), टिळक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, आवेश खान, प्रसिद्ध कृष्णा.

(Mukesh Kumar Left Out India Sqaud Before 3rd T20I Deepak Chahar Included)

हेही वाचा-
मोठी बातमी! नामीबिया T20 World Cup 2024साठी क्वालिफाय, 19 संघ फिक्स; आता 1 जागेसाठी 3 संघात टक्कर
T20 World Cup: विराटच्या विक्रमाची बरोबरी करणारा डेरिंगबाज सिकंदर! हॅट्रिक घेत इतिहासही घडवला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---