दिल्ली। इंडियन प्रीमीयर लीग २०२१ हंगामात २७ वा सामना शनिवारी (१ मे) चेन्नई सुपर किंग्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात पार पडला. अरुण जेटली स्टेडियमवर झालेल्या या सामन्यात मुंबई इंडियन्सने ४ विकेट्सने विजय मिळवला. या हंगामातील मुंबईचा हा चौथा विजय ठरला. त्याचबरोबक हा विजय मुंबईसाठी खास ठरला. कारण मुंबईने ‘महाराष्ट्र दिनाच्या’ दिवशी म्हणजेच १ मे रोजी हा विजय मिळवला. त्यामुळे मुंबई इंडियन्सने एक खास ट्विट केले, जे सध्या व्हायरल होत आहे.
मुंबई इंडियन्सचं खास ट्विट
मुंबई इडियन्सने चेन्नईविरुद्ध सामना जिंकताच मुंबई इंडियन्सने ट्विट केले की ‘महाराष्ट्र दिन. महाराष्ट्राची टीम. विजयी.’ या ट्विटने अनेक महाराष्ट्रीयन चाहत्यांची मने जिंकली आहेत. या ट्विटला अनेक रिट्विट तसेच प्रतिक्रियाही आल्या आहेत.
https://twitter.com/mipaltan/status/1388554095955365892
१ मे रोजी साजरा केला जातो महाराष्ट्र दिन
महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीसाठी शेकडो हुतात्म्यांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. पण अखेर १ मे १९६० रोजी मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची स्थापना करण्यात आली. त्यामुळे १ मे या दिवशी दरवर्षी ‘महाराष्ट्र दिन’ साजरा केला जातो.
खरंतर याच दिवसाचे औचित्य साधत मुंबई इंडियन्सने हे ट्विट केले होते. मुंबई महाराष्ट्राची राजधानी असून आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्स हा महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणारा संघ मानला जातो. त्यामुळे महाराष्ट्रातून या संघाला मोठा पाठिंबाही मिळतो.
https://twitter.com/mnsreport9/status/1388566814875996162
https://twitter.com/miPatilVivek/status/1388558327672541184
https://twitter.com/gdeshmukh1984/status/1388568562864852994
https://twitter.com/MarathiBrain/status/1388558584422617097
https://twitter.com/dikhhat_hai_/status/1388555504566169600
https://twitter.com/BarsagadeAnkit/status/1388559284628201474
रोमांचक सामन्यात मुंबई इंडियन्सचा विजय
शनिवारी मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेत चेन्नईला फलंदाजीसाठी पाचारण केले होते. त्यानुसार चेन्नईने प्रथम फलंदाजी करताना २० षटकात ४ बाद २१८ धावा केल्या. चेन्नईकडून मोईन अलीने ३६ चेंडूत ५८ धावा, फाफ डू प्लेसिसने २८ चेंडूत ५० धावा आणि अंबाती रायडूने २७ चेंडूत नाबाद ७२ धावांची अर्धशतकी खेळी केल्या. तसेच मुंबईकडून कायरन पोलार्डने सर्वाधिक २ विकेट्स घेतल्या.
प्रतिउत्तरादाखल फलंदाजीसाठी उतरलेल्या मुंबईने २१९ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना ८१ धावांवर ३ विकेट्स गमावल्या होत्या. मात्र त्यानंतर कायरन पोलार्डने कृणाल पंड्याला साथीला घेत ८९ धावांची भागीदारी रचली. या भागीदारीमुळे मुंबईच्या विजयाच्या अशा पल्लवित झाल्या अखेर पोलार्डने ६ चौकार आणि ८ षटकारांची आतिषबाजी करत ३४ चेंडूत नाबाद ८७ धावांच्या खेळीसह मुंबईच्या विजयावर अखेरच्या षटकात शिक्कामोर्तब केले. त्याच्याशिवाय मुंबईकडून कृणालने ३२, रोहित शर्माने ३५ आणि क्विंटन डी कॉकने ३८ धावांचे योगदान दिले. चेन्नईकडून सॅम करनने सर्वाधिक ३ विकेट्स घेतल्या.
महत्त्वाच्या बातम्या –
मुंबई आणि चेन्नईच्या उत्कंठावर्धक सामन्यादरम्यान धवल कुलकर्णीचा ‘हा’ मोठा विक्रम राहिला दुर्लक्षित
‘मॅचविनर’ पोलार्डच्या ‘त्या’ ८ गगनभेदी षटकारांची मेजवानी, पाहा व्हिडिओ
पोलार्ड पॉवर! धमाकेदार खेळी करत ठोकले आयपीएल २०२१ मधील वेगवान अर्धशतक