---Advertisement---

मुंबई वि केकेआर: डी कॉक- रोहितची धुमधडाका सुरुवात; अकराव्या षटकानंतर मुंबई एक बाद ८६

On: गुरूवार, सप्टेंबर 23, 2021 7:16 PM
---Advertisement---

आयपीएल २०२१ मधील ३४ वा सामना गतविजेत्या मुंबई इंडियन्स व कोलकाता नाईट रायडर्स यांच्यात खेळला जात आहे. हा सामना शेख झायेद क्रिकेट स्टेडियम अबुधाबी येथे होतोय. या सामन्यात केकेआरचा कर्णधार ओएन मॉर्गनने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. या सामन्यासाठी मुंबईच्या संघात कर्णधार रोहित शर्मा याचे पुनरागमन झाले. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने पहिल्या ११ षटकात रोहित शर्माचा बळी गमावत ८६ धावा केल्या.

 

रोहित-डी कॉकची धमाकेदार सुरुवात

पहिल्या सामन्यात विश्रांती घेतलेल्या रोहित शर्माने या सामन्यातून पुनरागमन केले. त्याने यष्टीरक्षक क्विंटन डी कॉकसह नावाची सुरुवात केली. दोघांनी पहिल्या षटकापासून आक्रमक धोरण स्वीकारले. पावर प्लेमध्ये मुंबईने ५० पेक्षा अधिक धावा काढल्या. मुंबईच्या डावाच्या दहाव्या षटकात सुनील नरीनला उंचावरून फटका मारण्याच्या नादात रोहित वैयक्तिक ३३ धावांवर बाद झाला. अकरा षटकानंतर मुंबईची धावसंख्या ८६ झाली असून, डी कॉक ४६ तर, सूर्यकुमार यादव ४ धावांवर खेळत आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---