महिला प्रीमियर लीग स्पर्धेतील एलिमिनेटर सामन्यांमध्ये गुजरात जायंटसने नाणेफेक जिंकून पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. एलिमिनेटरच्या महत्त्वाच्या सामन्याआधी गुजरातला मोठा झटका बसला आहे. गुजरात संघातील मोठी खेळाडू दुखापती झाली आहे. त्यामुळे गुजरात जायंटस संघाला प्लेइंग इलेव्हन मध्ये मोठा बदल करावा लागला. डब्ल्यूपीएल 2025 स्पर्धेत सुरुवातीपासूनच नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याची पद्धत चालत आली आहे. गुजरातने या हंगामात त्यांच्या चार सामन्यात तीन विजय प्रथम गोलंदाजी करूनच मिळवले आहेत.
एलिमिनेटर सामन्याआधी गुजरातची डिएंड्रा डॉटिन ही दुखापती झाली आहे. तिने आत्तापर्यंत महिला प्रीमियर लीग 2025 स्पर्धेत 142 धावा केल्या आहेत. तिने जास्त धावा तर नाही केल्या, पण तिचा 154 चा स्ट्राईक रेट पूर्ण हंगामात गुजरातसाठी मोठी ताकद ठरला आहे. तिच्या जागी गुजरात संघाने डेनियल गिब्सनला संघामध्ये स्थान दिले आहे. गुजरात संघाची कर्णधार एश्ले गार्डनरने आश्वासन दिले आहे की, एलिमिनेटर सामन्यात ते जास्त स्कोर करतील.
एलिमिनेटर सामन्यात मुंबई इंडियन्स संघाने त्यांच्याही प्लेइंग इलेव्हनमध्ये बदल केला आहे. नाणेफेक दरम्यान कर्णधार हरमनप्रीत कौर तिने सांगितले की, परुनिका सामन्यात खेळणार नाही. तिच्या जागी उजव्या हाताची गोलंदाज सायका इशाक हि प्लेइंग इलेव्हन मध्ये सामील आहे. महिला प्रीमियर लीगच्या इतिहासात गुजरात एकदाही मुंबई इंडियन्स संघाला पराभूत करू शकला नाही. त्यांच्यामधील सर्व 6 सामन्यात मुंबई इंडियन्सने गुजरातचा पराभव केला आहे.
मुंबई इंडियन्स संघाची प्लेइंग इलेव्हन:- हेली मैथ्यूज, अमेलिया केर, नट साइवर-ब्रंट, हरमनप्रीत कौर (कर्णधार), अमनजोत कौर, यास्तिका भाटिया, सजीवन सजना, जी कमलिनी, संस्कृति गुप्ता, शबनीम इस्माइल, सायका इशाक
गुजरात जायंट्स संघाची प्लेइंग इलेव्हन : – बेथ मूनी, काशवी गौतम, हरलीन देओल, एश्ले गार्डनर (कर्णधार), फोबे लिचफील्ड, डेनियल गिब्सन, भारती फुलमाली, सिमरन शेख, तनुजा कंवर, मेघना सिंह, प्रिया मिश्रा






