---Advertisement---

विषय आहे का! मुंबईने विक्रमी ४७व्यांदा गाठली फायनल, अंतिम सामन्यात ‘या’ संघाचे आव्हान

On: रविवार, जून 19, 2022 12:46 PM
Mumbai-Ranji-Team
---Advertisement---

भारतात सुरू असलेली मानाची रणजी ट्रॉफी २०२१-२२ संपायला आली आहे. रणजी ट्रॉफीचा दुसरा उपांत्य सामना मुंबई विरुद्ध उत्तर प्रदेश यांच्यात खेळला गेला. पाचव्या दिवसाखेर हा सामना अनिर्णीत राहिला आणि पहिल्या डावातील आघाडीच्या जोरावर मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला. यासह मुंबई संघाने इतिहास रचला आहे. आता अंतिम सामन्यात त्यांच्यापुढे मध्य प्रदेश संघाचे आव्हान असेल, जो २२ ते २६ जूनदरम्यान खेळला जाईल. 

असा राहिला दुसरा उपांत्य सामना
बंगळुरू येथे झालेल्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात (Ranji Trophy Semi Final) मुंबईने (Mumbai) सुरुवातीपासूनच सामन्यावर त्यांची मजबूत पकड बनवली होती. प्रथम फलंदाजी करताना मुंबईने १४०.४ षटकात ३९३ धावा केल्या होत्या. या डावात मुंबईकडून २ फलंदाजांनी शतके केली होती. सलामीवीर यशस्वी जयस्वालने २२७ चेंडू खेळताना १५ चौकारांच्या मदतीने १०० धावा केल्या होत्या. तसेच यष्टीरक्षक हार्दिक तामोरेने ११५ धावांची खेळी केली होती. शम्स मुलानीनेही अर्धशतक करत धावपलक पुढे नेला होता. या डावात उत्तर प्रदेशकडून कर्णधार करण शर्माने सर्वाधिक ४ विकेट्स घेतल्या होत्या.

प्रत्युत्तरात उत्तर प्रदेशचा संघ ५४.३ षटकात १८० धावांवरच सर्वबाद झाला होता. त्यामुळे पहिल्या डावात उत्तर प्रदेशचा संघ २१३ धावांची पिछाडीवर पडला होता. या डावात उत्तर प्रदेशकडून एकाही खेळाडूला अर्धशतकही करता आले नव्हते. एकटा शिवम मावी ४८ धावा करू शकला होता. या डावात मुंबईकडून तुषार देशपांडे, मोहित अवस्ती आणि तुष कोटयन यांनी प्रत्येकी ३ फलंदाजांना बाद केले होते.

प्रत्युत्तरात पुन्हा मुंबईच्या फलंदाजांच्या बॅट तळपल्या आणि त्यांनी पाचव्या दिवसाखेर ५३३ धावा जोडल्या. या डावात मुंबईकडून सलामीवीर यशस्वी जयस्वालने सर्वाधिक १८१ धावा केल्या. त्याच्या साथीला अरमान जाफरने १२७ धावांचे योगदान दिले होते. तसेच कर्णधार पृथ्वी शॉ (६४ धावा), सरफराज खान (५९ धावा) आणि शम्स मुलानी (५१ धावा) यांच्या अर्धशतकी खेळींनी संघाला मजबूत धावसंख्या उभारून दिली.

मुंबईकडे ४२वे विजेतेपद जिंकण्याची संधी
अशाप्रकारे मुंबईचा संघ विक्रमी ४७व्यांदा अंतिम सामन्यात पोहोचला आहे. आता त्यांच्याकडे ४२ व्यांदा रणजी ट्रॉफी उंचावण्याची संधी असेल. यापूर्वी २०१५-१६ मध्ये मुंबईने अंतिम सामन्यात प्रवेश केला होता. त्यानंतर मात्र त्यांना रणजी ट्रॉफीवर आपला हक्क सांगता आला नव्हता. मात्र आता ६ वर्षांनंतर त्यांनी पुन्हा एकदा अंतिम सामना (Ranji Trophy Final) गाठला आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या-

संघात स्थान मिळाले, पण खेळण्याची संधी नाही; राहुल त्रिपाठीबाबत माजी दिग्गजाचे मोठे वक्तव्य

मध्य प्रदेशचा बंगालवर विक्रमी विजय, १७४ धावांनी सामना जिंकत २३ वर्षांनंतर गाठली फायनल

भारीच ना! थेट पंजाबच्या मुख्यमंत्र्यांनीच पूर्ण केली होती मिल्खा सिंग यांची प्रेमकहाणी; असं जुळलं होतं सूत

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---