---Advertisement---

मुंबई शहर “पंच उजळणी शिबिर” रविवारी रायगड जिल्ह्यात

---Advertisement---

मुंबई शहर कबड्डी असो.च्या विद्यमाने रविवार दि.२२सप्टेंबर २०१९ रोजी सकाळी ८-००वा. हॉटेल आचल, नागाव-रायगड येथे ” पंच उजळणी शिबिराचे ” आयोजन करण्यात आले आहे. लवकरच मुंबईत कबड्डीचा हंगाम सुरू होणार आहे. याकरिता मुंबईतील पंचांच्या निर्णयात सुसूत्रता व एकवाक्यता यावी. शिवाय या अगोदर पंचाना निर्णय देताना आलेले बरे-वाईट अनुभव, त्यातून त्यांनी दिलेले निर्णय, त्याचा सामन्यावर होणारा परिणाम. यावर देखील चर्चा घडवून आणली जाईल.

विश्वास मोरे-पंच मंडळ – सचिव- भारतीय हौशी कबड्डी महासंघ, व मनोहर इंदुलकर – कार्याध्यक्ष – मुंबई शहर कबड्डी असो. हे पंचांना महत्वपूर्ण असे मार्गदर्शन करणार आहेत.

नवविर्वाचित पदाधिकारी व कार्यकारणी सदस्य या प्रसंगी उपस्थित राहणार आहेत. अधिक माहितीसाठी मुंबई पंच मंडळ -अध्यक्ष महेंद्र हळदणकर -९८९२४०३५००, व सचिव सूर्यकांत देसाई – ९८६९००३२२८ यांच्याशी संपर्क साधावा. सर्व पंच सदस्यांनी या शिबिरात उपस्थित राहून आपल्या ज्ञानात भर घालून घ्यावी असे आव्हान या पत्रकाद्वारे मुंबई शहर कबड्डी संघटनेचे सचिव विश्वास मोरे यांनी केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment