पुणे (23 मार्च 2024) – के. एम. पी. युवा कबड्डी सिरीज 2024 मध्ये आज प्रमोशन फेरीतील सामन्याचा पाचव्या दिवशी मुंबई शहर विरुद्ध बीड यांच्यात सामना झाला. दोन्ही संघानी आपले पहिले चारही सामने गमावले होते त्यामुळे आज कोणता संघ सामना जिंकणार यांची उत्सुकता होती. दोन्ही संघानी सावध खेळ करत सामन्याला सुरुवात केली. मुंबई शहर कडून राज आचार्य ने पहिला गुण मिळवला. तर ऋषिकेश झांबरे ने राज आचार्यची पकड पहिला गुण मिळवत बीड संघाचा खात उघडला.
सामना अत्यंत चुरशीचा बघायला मिळाला. पहिल्या दहा मिनिटाच्या खेळानंतर सामना 6-6 असा बरोबरीत होता. मध्यंतरा पर्यत सामना असाच रोमहर्षक झाला. मुंबई शहर कडे केवळ 15-12 अशी आघाडी होती. मध्यंतरा नंतर मुंबई शहर ने बीड संघाला ऑल आऊट करत आपली आघाडी वाढवली. जतिन विंदेच्या आक्रमक चढायांनी मुंबई शहर ने सामन्यावर आपली पकड मजबूत केली होती. बीड कडून शंकर मेघाने एकाकी झुंज देत होता. मुंबई शहर कडून रुपेश साळुंखे ने आज जबरदस्त पकडी केल्या.
उत्तरार्धात मुंबई शहर ने उत्कृष्ट खेळ करत सामन्यावर आपली पकड ठेवली. मुंबई शहर ने 36-22 अशी बीड संघावर मात देत प्रमोशन फेरीत पहिला विजय मिळवला. मुंबई शहर कडून जतिन विंदे ने सुपरर टेन पूर्ण करत 13 गुण मिळवले. तर राज आचार्य ने चढाईत 8 गुण मिळवले. बचावपटू रुपेश साळुंखे ने पकडीत एकूण 5 गुण मिळवले. बीड कडून शंकर मेघाने चढाईत 11 गुण मिळवले. (Mumbai City’s first win in the promotion round)
बेस्ट रेडर- जतिन विंदे, मुंबई शहर
बेस्ट डिफेंडर- रुपेश साळुंखे, मुंबई शहर
कबड्डी का कमाल – जतिन विंदे, मुंबई शहर
महत्वाच्या बातम्या –
कोलकाता आणि हैदराबाद आमने-सामने, कोण ठरणार वरचढ? घ्या जाणून हेड टू हेड आकडेवारी
454 दिवसांनंतर मैदानात परतल्यावर ऋषभ पंत भावूक! म्हणाला, लहान लहान…