---Advertisement---

३० वेळा आठवण करुन देऊनही मुंबई क्रिकेट असो. पोलीसांचे पैसे काही देईना

On: मंगळवार, जुलै 21, 2020 3:22 PM
---Advertisement---

मुंबई येथे होणाऱ्या क्रिकेट सामन्यांदरम्यान मुंबई पोलीस सुरक्षा पुरवत असतात, त्यासाठी त्यांना पैसे देणे ही मुंबई क्रिकेट असोसिएशनची जबाबदारी असते. मुंबईमध्ये झालेल्या वेगवेगळ्या सामन्यांचे तब्बल १४.८२ कोटी रुपये एमसीएने अद्याप दिलेले नाहीत. या थकबाकीसाठी मुंबई पोलीसांनी आतापर्यंत तब्बल ३० वेळा स्मरणपत्र (रिमाईंडर) पाठविण्यात आले आहे. परंतु ती थकबाकी अद्याप दिलेली नाही. माहितीच्या अधिकारांतर्गत माहिती अधिकार कार्यकर्ते अनिल गलगली यांना ही माहिती देण्यात आली आहे.

गलगली (Anil Galgali) यांनी सांगितले, की ३० स्मरणपत्र पाठवूनही एमसीए १४.८२ कोटी रुपयांची थकबाकी देण्यास तयार नाही. एमसीएला विविध क्रिकेट सामन्यांसाठी देण्यात आलेल्या सुरक्षा आणि त्यासाठी वसूल केलेल्या बंदोबस्त शुल्काची माहिती द्या, अशी माहिती गलगली यांनी मुंबई पोलिसांकडून याबाबत मागविली होती.

याला प्रत्युत्तर देत मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) मागील ८ वर्षांची माहिती दिली आहे. या सामन्यांमध्ये २०१३ चा महिला विश्वचषक, २०१६ चा टी२० विश्वचषक, २०१६ चा कसोटी सामना, २०१७ आणि २०१८ ची आयपीएल स्पर्धा तसेच वनडे सामना या सर्वांची १४ कोटी ८२ लाख ७४ हजार १७७ रुपयांची थकबाकी मुंबई क्रिकेट असोसिएशनने (Mumbai Cricket Association) आतापर्यंत दिलेली नाही.

एमसीएने मागील ८ वर्षांमध्ये केवळ २०१८ च्या आयपीएल क्रिकेट सामन्यांचे १.४० कोटी रुपयांचे शुल्क दिलेले आहे. १ एप्रिल २०१९ पासून ३१ मार्च २०२० मध्ये झालेल्या क्रिकेट सामन्यांचे शुल्क आतापर्यंत देण्यात आलेले नाही. त्यामुळे एमसीएकडून किती शुल्क आकारले जावे या संदर्भात कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत.

ट्रेंडिंग घडामोडी-

-प्रशिक्षणादरम्यान न्यूझीलंडच्या ‘या’ वेगवान गोलंदाजाची प्रकृती बिघडली

-टी२० विश्वचषक आयसीसीने ढकलला पुढे, आयपीएल आयोजनाचा मार्ग झाला मोकळा

-५ दिग्गज खेळाडू ज्यांनी कारकिर्दीतील शेवटचा सामना खेळला वर्ल्डकप फायनलमध्ये

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---