---Advertisement---

‘कर्णधार’ रोहित शर्माचा मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून होणार मोठा सन्मान, कारणही आहे खास

Hitman-Rohit-Sharma
---Advertisement---

कर्णधार रोहित शर्मा याच्या (Rohit Sharma) नेतृत्वातील भारतीय संघ सध्या अप्रतिम प्रदर्शन करत आहे. विराट कोहली याने (Virat Kohli) तिन्ही क्रिकेट प्रकारतील भारतीय संघाचे कर्णधारपद सोडले आणि रोहित शर्माला ती जबाबदारी दिली गेली. यानंतर रोहित भारताच्या तिन्ही संघाचा कर्णधार बनला आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबई क्रिकेट असोसिएशनकडून (MCA) रोहित शर्माला सन्मानित केले जाणार आहे. देशांतर्गत क्रिकेटमध्ये रोहित मुंबई संघाचा खेळाडू आहे.

पीटीआयने दिलेल्या माहितीनुसार, गुरुवारी झालेल्या एमसीएच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठकीत रोहितला सन्मानित करण्याचा निर्णय घेतला गेला. बैठकितील एका अधिकाऱ्याने माहिती दिली की, “आज वरिष्ठ परिषदेच्या बैठकीत रोहित शर्माला तिन्ही प्रकारांमध्ये भारताचा कर्णधार बनण्याबद्दल सन्मानित करण्याचा निर्णय केला जाईल. रोहितव्यतिरिक्त १९ वर्षाखालील विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघाचा सलामीवीर फलंदाज अंगक्रिश रघुवंशी याला रोख एक लाख रुपयांचा पुरस्कार देऊन सन्मानित केले जाईल.”

रोहित शर्मा आणि अंगक्रिश रघुवंशी यांच्याव्यतिरिक्त भारतीय संघाचा वेगवान गोलंदाज शार्दुल ठाकुर आणि फलंदाज सूर्यकुमार यादव यांना सन्मानित केले जाणार आहे, अशी माहिती माध्यमांमध्ये आहे. एमसीएने सांगितले की, आयपीएल २०२२ सुरू होण्यापूर्वी सन्मान समारोहाचे आयोजन केले जाईल, ज्यामध्ये पृथ्वी शॉ आणि सरफराज खान यांनाही सन्मानित केले जाईल.

दरम्यान, रोहित शर्माच्या नेतृत्वात भारतीय संघाने गुरुवारी श्रीलंकेविरुद्धचा पहिला टी-२० सामना जिंकला. पहिल्या सामन्यात भारताने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीमध्ये चांगले प्रदर्शन केले आणि ६२ धावा राखून श्रीलंकेला पराभूत केले. श्रीलंकेने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. भारताने प्रथम फलंदाजी करताना दोन विकेट्सच्या नुकसानावर १९९ धावा केल्या. प्रत्युत्तरात श्रीलंका संघ ६ विकेट्सच्या नुकसानावर २० षटकांमध्ये अवघ्या १३७ धावांपर्यंतच पोहोचू शकला.

प्रथम फलंदाजी करताना सलामीसाठी आलेल्या ईशान किशनने ५६ चेंडूत सर्वाधिक ८९ धावा केल्या. त्याला कर्णधार रोहित शर्माची (४४) चांगली सांध मिळाली. पहिल्या विकेटसाठी रोहित आणि ईशानने १११ धावांची भागीदारी केली आणि विजयामध्ये त्यांचे योगदान महत्वाचे राहिले. त्याव्यतिरिक्त तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या श्रेयस अय्यरने नाबाद ५७ धावा केल्या. श्रीलंकेसाठी चरिथ असालंकाने नाबाद ५३ धावा केल्या, पण त्यांच्या संघाला विजय मिळवता आला नाही.

महत्वाच्या बातम्या –

श्रीलंकेविरुद्ध पहिल्या टी२०त शानदार विजयानंतरही ‘या’ कारणामुळे कर्णधार रोहित नाराज

क्रिकेटच्या डॉनने २१ वर्षांपूर्वी घेतलेला अखेरचा श्वास, वाचा त्यांच्याबद्दलच्या खास गोष्टी

इशान, रोहित अन् श्रेयसच्या धुव्वांदार खेळीपुढे चांगलीच पिसली श्रीलंका; भारताने ६२ धावांनी सामना घातला खिशात

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---